मुंबई : कोरोना विषाणू फुफ्फुसांना कसा पोखरतो? याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती आता वैज्ञानिकांच्या हाती लागली आहे. या माहितीमुळे कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यास चांगली मदत होईल, असा दावा संशोधकांकडून करण्यात आला आहे. वैज्ञानिकांच्या या संशोधनाबात ‘मॉलिक्युलर सेल्स’ या नियतकालिकेत माहिती प्रकाशित करण्यात आली आहे (scientist research says how corona virus affect lungs).
जगभरात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. कोरोनाने संपूर्ण जग त्रस्त आहे. त्यामुळे कोरोनावर प्रभावी औषध शोधण्याचं काम वैज्ञानिकांकडून युद्ध पातळीवर सुरु आहे. कोरोनावर प्रभावी औषध शोधण्याबरोबर या आजारामुळे शरीरावर होणाऱ्या नुकसनावरही वैज्ञानिकांचा अभ्यास सुरु आहे. या अभ्यासादरम्यान आता वैज्ञानिकांना महत्त्वपूर्ण माहिती मिळाली आहे. कोरोना फुफ्फुसांवर कशाप्रकारे हावी होतो, कोरोनामुळे फुफ्फुसांच्या कामकाजावर कशाप्रकारे परिणाम होतो, याबाबतची माहिती वैज्ञानिकांना मिळाली आहे.
वैज्ञानिकांच्या संशोधनाला मोठं यश आल्याचं बोललं जात आहे. कारण यामुळे खराब झालेल्या फुफ्फुसांना ठीक करण्यासाठी या संशोधनाचा फायदा होणार आहे. या अभ्यासात स्पेक्ट्रोमेट्री तंत्रांचा वापर करून मानवी फुफ्फुसाच्या ‘एअर बॉसेस’च्या अभियांत्रिकी पेशींचे मूल्यांकन करण्यात आले. या संशोधनाच्या आधारे अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या (बसएम) शास्त्रज्ञांनी फुफ्फुसांच्या पेशींमधील प्रथिने आणि रेणूंचे मार्ग ओळखले, ज्यांचं प्रमाण कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर बदललं.
या अभ्यासामुळे कोरोनाबाधित रुग्णावर उपचार करण्यास चांगली मदत होईल, असा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. कोरोनाची लागण झाल्यास रुग्णाच्या फुफ्फुसांच्या पेशींमध्ये “फॉस्फोरिलेशन” नावाच्या प्रथिनांमध्ये लक्षणीय बदल होतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे.
पेशींमधील प्रथिनांच्या कार्यात प्रथिनांचे फॉस्फोरिलेशन हे महत्त्वाची भूमिका बजावतं. निरोगी पेशींच्या बाबतीत प्रथिने आणि प्रथिनांचे फॉस्फोरिलेशन हे सहसा अत्यंत नियंत्रणात असतात, अशी माहिती संशोधकांनी दिली (scientist research says how corona virus affect lungs).
कोरोनामुळे फुफ्फुसांच्या पेशींमध्ये बदल
कोरोनामुळे फुफ्फुसांच्या पेशींमध्ये बदल होतो. प्रथिनांच्या प्रमाणात असामान्य बदल होतात आणि या पेशींमध्ये प्रथिनांच्या फॉस्फोरिलेशनचं प्रमाण वाढतं. हे असामान्य बदल आहेत. याशिवाय यामुळे विषाणूंची संख्या वाढवण्यास मदत होते. कालांतराने विषाणू पेशी नष्ट करतात. त्यामुळे फुफ्फुसाला इजा होते, असं वैज्ञानिकांनी सांगितलं.
कोरोना विषाणूच्या संसर्गानंतर पेशींच्या कार्यप्रणालीवर परिणाम होत. वैज्ञानिकांनी कोरोना संसर्ग झाल्यानंतर पहिल्या 24 तासांत फुफ्फुसांच्या पेशींमध्ये काय परिणाम होतो? याचं निरीक्षण केलं. संसर्गानंतर पहिल्या एक, तीन आणि सहा तासांनी काय होते? याचा अभ्यास संशोधकांनी केला.
संशोधनात कोरोनाबाधित रुग्णाच्या फुफ्फुसांच्या पेशींमध्ये हजारो प्रथिने आणि फॉस्फोरिलेशन इव्हेंट्समध्ये नाट्यमय बदल दिसून आले, असं बसएम डॅरेल कॉटनयेथील पॅथॉलॉजीचे प्राध्यापक डेरेल कॉटन यांनी सांगितलं.
संशोधकांनी पूर्वी अस्तित्वात असलेली किमान 18 क्लीनकिल औषधे शोधून काढली, जी मुळात इतर आजार बरे करण्यासाठी विकसित करण्यात आले होते. संशोधनकांनी या औषधांवरही अभ्यास केला.
संबंधित बातम्या : मोठी बातमी ! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात जानेवारीपासून लसीकरण?, आदर पुनावाला यांचे संकेत