यंदा SCO परिषदेच यजमानपद पाकिस्तानकडे आहे. भारताच्यावतीने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर या परिषदेत सहभागी झाले आहेत. त्यांनी आपल्या भाषणात पाकिस्तानला भरपूर सुनावलं. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दहशतवादाच्या मुद्यावरुन पाकिस्तानला घेरलं. “भारताच्या अखंडतेच्या मुद्यावरुन चीनवरही निशाणा साधला. परस्परांमधला विश्वास कमी झाला असेल, पुरेस सहकार्य मिळत नसेल, मैत्री तितकी राहिली नसेल आणि चांगल्या शेजाऱ्याची कमतरता जाणवत असेल, तर त्यामागच्या कारणांच विश्लेषण झालं पाहिजे” असं जयशंकर म्हणाले.
प्रामाणिकपणे चर्चा करण्याची आवश्यकता आहे, असं जयशंकर पाकिस्तानला संदेश देताना म्हणाले. पाकिस्तान-चीनच्याCPEC प्रोजेक्टमुळे भारतीय संप्रभुतेच उल्लंघन होत असल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. “संप्रभुतेचा सन्मान झाला पाहिजे. क्षेत्रीय अखंडता ओळख असली पाहिजे. SCO देशांमध्ये एकतर्फी अजेंडा नाही, तर वास्तविक भागीदारी असली पाहिजे. ट्रेड आणि ट्रांसिटबद्दल सिलेक्टिव झालो, तर विकास होणार नाही” असं जयशंकर म्हणाले.
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर काय म्हणाले?
“SCO चार्टरच्या आर्टिकल 1 मध्ये आमचे उद्देश आणि कर्तव्य स्पष्टपणे सांगितली आहेत. त्यांचा उद्देश परस्परामध्ये मैत्री, विश्वास, शेजारी देशाबरोबर चांगले संबंध आणि क्षेत्रीय सहकार्य वाढवणं आहे” असं जयशंकर म्हणाले. “चार्टरमध्ये दहशतवाद, फुटीरतावाद आणि कट्टरता यांचा उल्लेख असून त्या विरोधात एकजुटीने लढलं पाहिजे. या आव्हानांचा सामना करण्यासाठी SCO कटिबद्ध आहे. वर्तमान परिस्थितीत या आव्हानाचा सामना करणं जास्त गरजेच झालय” असं जयशंकर म्हणाले.
Delivered 🇮🇳’s national statement at the SCO Council of Heads of Government meeting today morning in Islamabad.
SCO needs to be able and adept at responding to challenges facing us in a turbulent world. In this context, highlighted that:
➡️ SCO’s primary goal of combatting… pic.twitter.com/oC2wHsWWHD
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 16, 2024
SCO समिट आधी पाकिस्तान-चीनच्या पंतप्रधानांची बैठक
SCO समिट आधी पाकिस्तान आणि चीनच्या पंतप्रधानांची बैठक झाली. यावेळी चीनने, काश्मीर मुद्यावर शांततापूर्वक मार्गाने तोडगा काढण्याच आवाहन केलं. शहबाज शरीफ आणि ली कियांगच्या भेटीनंतर संयुक्त स्टेटमेंटमध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.