नवी दिल्ली – सौरमंडळाच्या (solar system)कक्षेच्या किनाऱ्यांवर असलेल्या छोट्या ताऱ्यांद्वारे, पृथ्वीवर पाणी आले असावे, असे नवे संशोधन समोर येते आहे. जपानने सहा वर्ष कलेल्या अंतराळ मोहिमेनंतर एकत्रित केलेल्या नमुन्यांनुसार वैज्ञानिकांनी हा आश्चर्यकारक संशोधनाचा दावा केलेला आहे. जीवनाची उत्पत्ती आणि ब्रह्मांडाच्या निर्माणावर प्रकाश टाकण्यासाठी, हे संशोधक 2020 मध्ये छोटा तारा (ateroids) रयुगुद्वारे (RYUGU)पृथ्वीवर परत आणण्यात आलेल्या नव्या सामग्रीचे विश्लेषण करीत आहेत.
AFP graphic showing the main stages of Japan’s Hayabusa2 space mission to the Ryugu asteroid pic.twitter.com/ZALQEoDMzm
हे सुद्धा वाचा— AFP News Agency (@AFP) July 11, 2019
जपानच्या अंतराळ तपास मोहिम (हायाबुसा-2) अवकाशात उतरले. या मोहिमेद्वारे तपासात 5.4 ग्रॅम पाषाणाची धूळ त्यांनी एकत्र केली. याचे अध्ययन आणि विशेल्षण केल्यानंतर, वैज्ञानिक आणि संशोधकांच्या एका गटाने जूनमध्ये असा दावा केला आहे की, पृथ्वीवर निर्माण झालेली जीवसृष्टी यांच्या निर्मितीतल काही अंश, अमीनो एसिड हे अंतराळात निर्माण झाले असल्याची शक्यता आहे.
सोमवारी प्रकाशित करण्यात आलेल्या जपान आणि अन्य देशांतील वैज्ञानिकांच्या एका अभ्यासानुसार, बाष्पशील आणि कार्बनने युक्त असलेल्या सी टाईप छोट्या ताऱ्यांद्वारे पृथ्वीवर पाणी आले असल्याची म्हणजच हे तारे हे पाण्यांचे मुख्य स्रोतांपैकी एक असण्याची शक्यता आहे. मात्र पृथ्वीवर या बाष्पशील पदार्थांचे येणे, हा अजूनही वादाचा विषय असल्याचेही सांगण्यात आले आहे. या अभ्यासात ओळखण्यात आलेल्या रयुगु कणांतील असलेले कार्बनिक पदार्थ हे बाष्पशील स्त्रोतांतील महत्त्वाचा भाग असल्याचे दर्शवते.
अशा प्रकारे निर्माण झालेले पदार्थ हे सूर्यमंडळाच्या बाहेरची उत्पत्ती असण्याची शक्यता असल्याचे मत वैज्ञानिकांनी व्यक्त केले आहे. मात्र पृथ्वीवर सुरुवातीला आलेला हाच एकमेव बाष्पशील स्रोत असण्याची शक्यता नसल्याचेही व्यक्त केले आहे. हायाबुसा-2 या मोहिमेला 2014 साली 300 दशलक्ष किलोमीटर दूर अंतरावर रयुगुचे हे मिशन सुरु करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी नमुन्यासाठी एक कॅप्सुल सोडण्यासाठी ते पुन्हा पृथ्वीच्या कक्षेत परतले होते.
नेटर एस्ट्रोनॉमी अध्ययनात, संशोधकांनी मोहिमेतील निष्कषांचे कौतुक केले आहे. संशोधनात लिहिण्यात आले आहे की, रयुगु कण हा प्रयोगशाळेत अध्ययन करण्यासाठी सर्वाधिक अप्रदूषित सौर प्रणातील एक सामग्री आहे. या बहूमूल्य नमुन्यांवर सुरु असलेले संशोधन निश्चितपणे प्रारंभिक सौर प्रणाली प्रक्रियेच्या आमच्या समजेचा विस्तार करेल.
हेही वाचा