Donald Trump : राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतरही पॉर्न स्टारमुळे डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, अमेरिकन कोर्टाचा मोठा निर्णय

| Updated on: Dec 17, 2024 | 7:35 AM

Donald Trump : एडल्ट स्टार स्टॉर्मी डेनियल्स सोबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधांची 2016 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बरीच चर्चा झाली होती. स्टॉर्मी डेनियल्स डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध सार्वजनिक करण्याची धमकी देत होती.

Donald Trump : राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतरही पॉर्न स्टारमुळे डोनाल्ड ट्रम्प यांना झटका, अमेरिकन कोर्टाचा मोठा निर्णय
donald trump
Follow us on

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीआधी डोनाल्ड ट्रम्प यांना (हश मनी केस) गुप्त धनसह 34 प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं. त्यानंतर ते अमेरिकेची राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले. आता प्रश्न हा आहे की, राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प जेलमध्ये जाण्यापासून स्वत:ला वाचवू शकतात का? या प्रकरणात कोर्टाने महत्त्वाचा निकाल दिलाय. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना गुप्त धन प्रकरणात (हश मनी केस) आपल्या पदामुळे कुठलाही दिलासा मिळणार नाही. त्यांची शिक्षा कायम राहीलं, असं कोर्टाने आपल्या निकालात म्हटलं आहे.

एडल्ट स्टार स्टॉर्मी डेनियल्स सोबत डोनाल्ड ट्रम्प यांच्या संबंधांची 2016 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बरीच चर्चा झाली होती. स्टॉर्मी डेनियल्स डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतचे संबंध सार्वजनिक करण्याची धमकी देत होती. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी तिला तोंड बंद ठेवण्यासाठी गुपचूप पैसे दिले. ट्रम्प यांनी डेनियल्सला जे 1लाख 30 हजार डॉलर्स दिले, तो पैशांचा व्यवहार लपवण्यासाठी व्यावसायिक रेकॉर्डमध्ये हेराफेरी केल्याच्या प्रकरणात त्यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

77 वर्षांचे ट्रम्प अमेरिकेचे पहिले असे राष्ट्राध्यक्ष आहेत, ज्यांना गुन्हेगार ठरवण्यात आलं आहे. ट्रम्प यांनी त्यांच्या विरोधात सुरु असलेला हा खटला म्हणजे गडबड असल्याच म्हटलं होतं. मॅनहट्टन कोर्ट रुमच्या बाहेर ट्रम्प यांनी न्यायाधीशावर पक्षपाती आणि भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. ‘न्यायाधीश भ्रष्ट आहे. खटल्यामध्ये गडबड आहे’ असा आरोप ट्रम्प यांनी केला होता.

ट्रम्प यांचा शपथविधी कधी?

डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारी 2025 रोजी अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. रिपब्लिकन पार्टीने सिनेटवर नियंत्रण मिळवलय. त्यांच्याकडे 52 जागा आहेत. डेमोक्रॅट्सकडे 47 सीट आहेत. हाऊस ऑफ रिप्रेजेंटेटिवमध्ये सुद्धा रिपब्लिकन्सकडे आघाडी आहे. त्यांच्याकडे 216 जागा आहेत. डेमोक्रॅट्सजवळ 209 सीट्स आहेत.

ट्रम्प यांना द्यावी लागली नुकसान भरपाई

ट्रम्प यांच्याविरोधात गुन्हेगारीशी संबंधित चार प्रकरण आहेत. यातले दोन आरोप न्याय विभागाचे स्पेशल वकील जॅक स्मिथने लावले आहेत. यातील एक प्रकरण न्यू यॉर्क, दुसरं जॉर्जियामध्ये आहे. फक्त न्यू यॉर्कच्या प्रकरणात निकाल आला आहे. जून महिन्यात ज्युरीने एका प्रकरणात ट्रम्पला सर्व 34 आरोपांमध्ये दोषी ठरवलं होतं. पत्रकार ई. जीन कॅरोल यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणात दोन सिविल प्रकरणात ट्रम्पना दोषी ठरवलय. यात महिला पत्रकाराला 88.4 मिलियन डॉलर्सची नुकसान भरपाई देण्यात आली. ट्रम्प यांनी दोन्ही निर्णयांविरोधात अपील केलं होतं.