दुबईत आकाश झाले हिरवे, व्हिडिओ पाहून अनेकांनी व्यक्त केले आश्चर्य

| Updated on: Apr 18, 2024 | 8:01 PM

संयुक्त अरब अमिरातीच्या सात अमिरातींना सध्या पावसाचा तडाखा बसला आहे. या वाळवंटी भागात अतिवृष्टी आणि वादळामुळे पूर आला आहे. यामुळे दुबईत सर्वाधिक नासधूस झाली आहे. दुबईमध्ये पावसामुळे एक अनोखा नजारा पाहायला मिळाला, ज्यामध्ये आकाश हिरवेगार दिसत आहे.

दुबईत आकाश झाले हिरवे, व्हिडिओ पाहून अनेकांनी व्यक्त केले आश्चर्य
Follow us on

दुबई : दुबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस आणि पुरामुळे लोकं त्रस्त आहे. यूएईमध्ये अभूतपूर्व हवामान पाहायला मिळाले आहे. महापुरामुळे संयुक्त अरब अमिराती (UAE) मधील रस्ते जलमय झाले आहेत. दुबईच्या हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. लोकांना रस्त्याने प्रवास करणेही कठीण झाले आहे. कारण रस्त्यावर पाणी साचले आहे. यूएईच्या सात अमिरातींमध्ये सामान्य व्यवहार ठप्प झाले आहेत. UAE मध्ये गेल्या 75 वर्षातील हा सर्वात जास्त पाऊस असल्याचे सांगितले जात आहे. UAE च्या सरकारी हवामान संस्थेने याचे वर्णन “ऐतिहासिक हवामान घटना” म्हणून केले आहे. UAE मधील मुसळधार पावसामुळे तयार झालेली परिस्थिती चर्चेत आहे. कारण स्मार्ट सिटी पाण्याखाली बुडाली होती. पण या दरम्यान दुबईचे आकाश हिरवे झाल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अनेक युजर्सने याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे. तर अनेकांनी हे भविष्यासाठी धोकादायक असल्याचे म्हटले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ म्हणजे राखाडी आकाश धुके हिरवे होत असल्याचे दाखवणारी कालबाह्य क्लिप आहे. 17 एप्रिल रोजी पोस्ट केलेल्या 23 सेकंदाच्या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे: “दुबईमध्ये आकाश हिरवे झाले! एका यूजरने लिहिले की, “आज दुबईला आलेल्या वादळाचे खरे फुटेज. आकाश हिरवे झाले आहे ते तुम्ही पाहू शकता !!!”

आणखी एकाने व्हिडिओ पोस्ट करताना लिहिले की, “सध्या दुबईमध्ये मुसळधार पाऊस, लाईव्ह फुटेजमध्ये आकाश हिरवे झाले आहे, संपूर्ण शहर धुळीने माखलेले दिसतेय.

शास्त्रज्ञ काय म्हणाले

“वादळाच्या ढगांमध्ये पुरेशी खोली आणि पाण्याचे प्रमाण असलेले पाणी/बर्फाचे कण प्रामुख्याने निळा प्रकाश पसरवतात,” असे राष्ट्रीय हवामान सेवा अधिकाऱ्यांच्या हवाल्याने अहवालात म्हटले आहे. जेव्हा वातावरणात विखुरलेला लाल प्रकाश ढगांमधील निळ्या पाण्याचे/बर्फाच्या थेंबांना प्रकाशित करतो तेव्हा ते हिरवे दिसू लागतात. अहवालात असे म्हटले आहे की “निळे-हिरवे आकाश आणि चक्रीवादळ उत्पादन यांच्यात कोणताही ज्ञात संबंध नाही.”