अफगाणिस्तानमध्ये अजून शेवटचा बुरुज ढासाळायचा राहिलाय. पंजशीरवर ताबा मिळवण्यात तालिबानला अजूनही यश आलेलं नाही आणि लढाई अंतिम टप्यात असल्याचं दिसतंय. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह हे अजूनही पंजशीरमध्ये खिंड लढवतायत. ते पंजशीरमध्येच आहेत आणि तालिबानविरोधी जो गट आहे एनआरएफ त्याचं नेतृत्व करतायत. कुठल्याच स्थितीत तालिबानसमोर सरेंडर करणार नसल्याची घोषणा सालेह यांनी केलीय.
सालेह यांनी गार्डला नेमकं काय सांगितलं?(Amrullah Saleh Panjshir Valley)
सालेह यांना तालिबाननं आधी नव्या सरकारमध्ये सहभागी करुन घेण्याचे प्रयत्न केले पण ना अल कायदा, ना पाकिस्तान ना तालिबान सालेह यांना राजी करु शकलं नाही. उलट सालेह यांनी राष्ट्रपती अशरफ गनी देश सोडून गेल्यानंतर स्वत:ला राष्ट्रपती घोषीत केलंय. राष्ट्रपतीचं निधन किंवा तो उपलब्ध नसेल तर उपराष्ट्रपती हाच अफगाणिस्तानचा राष्ट्रपती होतो, त्याच नियमानुसार सालेह यांनी राष्ट्रपती असल्याचं घोषीत केलंय. ह्या दरम्यान तालिबानसोबत लढताना जखमी झालो तर डोक्यात दोन वेळा गोळी घाल असे आदेशच सालेह यांनी स्वत:च्या गार्डला दिल्याचं समजतं.
डेली मेलमध्ये सालेह यांनी लिहिलं?
ब्रिटनचं नामांकित वर्तमानपत्र आहे डेली मेल. त्यात अमरुल्लाह सालेह यांनी एक लेख लिहिलाय. ज्यादिवशी म्हणजेच 15 ऑगस्टला तालिबाननं ताबा घेतला, त्यादिवशी काबूलमध्ये नेमकं काय झालं यावर लेखात प्रकाश टाकण्यात आलाय. सालेह यांच्या दाव्यानुसार- तालिबान काबूलमध्ये पोहोचताच त्यांना काबूलच्या पोलीस प्रमुखांनी फोन केला. जेलमधले तालिबानी कैदी हे बंड करतायत आणि ते पळून जाण्याची तयारी करत असल्याचं पोलीस प्रमुखानं सालेह यांना सांगितलं. त्यावेळेस सालेह यांनी पोलीस प्रमुखांना गैर तालिबानी कैद्यांचं नेटवर्क तयार करुन तालिबान्यांचा विरोध मोडीत काढायला सांगितलं. सालेह यांनी लेखात असही म्हटलंय की, 15 ऑगस्टच्या सकाळी सालेह यांनी संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह खान मोहम्मदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हमदुल्लाह मोहिब यांना फोन केला पण त्यांच्याकडून कुठलही उत्तर मिळालं नाही. ते कमांडोजची तैनाती करण्यात अपयशी ठरले.
A video message sent to us @BBCWorld from one of the leaders of the anti-Taliban resistance, fmr VP @AmrullahSaleh2 who says they’re under attack from terrorists and points the finger of blame at Pakistan. Pakistan of course deny they support Taliban forces #Panjshir #Afghanistan pic.twitter.com/w3e6GnrRXi
— Yalda Hakim (@BBCYaldaHakim) September 3, 2021
जे पळाले ते तर डरपोक
अमरुल्ला सालेह असं लिहितात की- मी काबूलच्या पोलीस प्रमुखांशी बोललो. ते एक बहादूर अधिकारी आहेत. त्यांनी मला सांगितलं की, आपण पूर्व सीमेवर पराभूत झालोत आणि आणखी दोन जिल्हे तालिबानच्या ताब्यात गेले. (Taliban Control)त्यांनी कमांडोज तैनात करण्यासाठी माझ्याकडे मदत मागितली पण मला ते शक्य झालं नाही. मी त्यांना आहे त्या सैनिकांसह परिस्थितीचा सामना करायला सांगितलं. ह्या सगळ्या कठिण प्रसंगी मी फौज एकत्र करु शकलो नाही. सालेह पुढं असही सांगतात-इंटेलिजन्स प्रमुख माझ्याकडे आले आणि म्हणाले,
तुम्ही जिकडे जाल तिकडे मी सोबत येणार. आम्ही शेवटच्या लढाईपर्यंत तुम्हाला साथ देणार. सालेह म्हणतात- जे नेते विदेशात गेले, तिकडं स्टार हॉटेल्समध्ये रहातायत ते डरपोक आहेत. आणि हेच लोक तिकडून गरीब अफगाण जनतेला लढायला सांगतायत.
अहमद मसूदशी फोनवर चर्चा
तालिबाननं काबूलचा कब्जा घेतल्यानंतर मी अहमद मसूद यांना फोन लावल्याचं सालेह यांनी लिहिलंय. फोन करुन मी त्यांना विचारलं की, भाई तुम्ही कुठे आहात, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की, काबूलमध्येच आहे आणि पुढची योजना आखतोय. त्यावेळेस मी त्यांना म्हणालो की, मलाही तुमच्या फोर्सेससोबत जोडून घ्या. त्यानंतर सालेह हे स्वत:च्या घरी गेले. पत्नी आणि मुलींना सोबत घेतलं. आणि घरातून बाहेर पडण्यापुर्वी सालेह यांनी पत्नी, मुलींचे फोटो नष्ट केले.(Amrullah Saleh Resistance Forces)सालेह यांनी, काबूल सोडण्यापुर्वी
घरातले कॉम्प्युटर वगैरेही नष्ट केल्याचं सांगितलं
आणि कुराणवर हात ठेवला
सालेह लेखात असं लिहितात- घरातून बाहेर पडताना त्यांनी त्यांच्या प्रमुख गार्डला कुराणावर हात ठेवायला सांगितला. त्याने तो ठेवला.(Amrullah Saleh Guard) सालेह म्हणतात- मी त्यांना सांगितलं की, आपण पंजशीरला जातोयत. रस्ते, सडका तालिबानच्या ताब्यात आहेत. आपण लढाई लढणार. माझा हा आग्रह आहे की, जर लढताना मी जखमी झालो तर माझ्या डोक्यात तू दोन गोळ्या घाल. कारण मी कधीच तालिबानसमोर सरेंडर करणार नाही. त्यानंतर मात्र ते अनेक संकटांचा सामना करत पंजशीरला पोहोचल्याचं सालेह यांनी लिहिलय. आता ते तिथूनच तालिबानच्याविरोधात लढाई लढतायत.
पोलीस अधिकाऱ्यानं लावली दोन पहिलवानांची कुस्ती, जळगावच्या वरणगावात कोरोना नियमांना तिलांजली
मग तालिबानमध्ये जा, केंद्रीय मंत्री कपिल पाटलांचा जावेद अख्तर यांना अजब सल्ला
जावेद अख्तर म्हणाले, आरएसएस, व्हीएचपी आणि बजरंग दल तालिबानसारखेच, भाजपकडून माफीची मागणी