मला वाटतं इतिहासातील ही अशी एकमेव दुर्घटना आहे, ज्यात कोणी वाचलं तर नाही ना, म्हणून प्रत्येक जण चिंतित आहे….विश्व हेलिकॉप्टर दिवसाच्या शुभेच्छा. हे शब्द आहेत, इराणी -अमेरिकन पत्रकार मासिह अलीनेजादचे. इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाल्याच समजल्यानंतर तिने सोशल मीडियावर हा मेसेज पोस्ट केला. रईसी यांचं हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर शेकडो इराणी नागरिकांनी शहरातील मुख्य चौकात जमा होऊन त्यांच्या सलामतीसाठी प्रार्थना केली. पण एकाबाजूला ते इराणी सुद्धा आहेत, जे इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूच सेलिब्रेशन करतायत. खुद्दा इराणमध्ये राहणारे आणि परदेशात राहणाऱ्या इराणी नागरिकांनी हेलिकॉप्टर क्रॅशच्या घटनेचं सेलिब्रेशन करणारे मीम्स शेअर केले आहेत. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
इराणमध्ये काही लोक रात्री फटाके फोडून सेलिब्रेशन करत असल्याच व्हिडिओमध्ये दिसतय. इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेवर इराणी सोशल मीडिया जोक्सनी भरलेला आहे, असं पत्रकार मासिह अलीनेजादने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर म्हटलय. ज्यांचा आवाज दडपण्यात आला, असे लोक अशा पद्धतीने पलटवार करतात. अलीनेजादने एक व्हिडिओ शेअर केलाय. त्यात एक महिला नाचताना दिसतेय. नाचणाऱ्या महिलेच्या मुलाचा काही महिन्यांपूर्वी इब्राहिम रईसी यांच्यामुळे मृत्यू झाला. आता ती नाचून सेलिब्रेशन करतेय असं व्हिडिओ शेअर करणाऱ्या पत्रकाराने दावा केला आहे. त्याने पुढे लिहिलय की, “मी तुम्हाला सांगितलं होतं, इराणच्या महिला घायाळ आहेत, पण अत्याचार करणाऱ्यांसमोर त्या कधी झुकणार नाहीत”
सेलिब्रेशन का सुरु आहे? असा प्रश्न पडू शकतो
इब्राहिम रईसी फक्त इराणचे राष्ट्रपती नव्हते, तर इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांच्यानंतर ते त्यांची जागा घेणार होते. असं असताना इराणमध्ये एवढ्या मोठ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर इराणमध्येच सेलिब्रेशन का सुरु आहे? असा प्रश्न पडू शकतो.
“Celebratory fireworks light up the sky in Iran following the helicopter crash involving President Raisi and Foreign Minister Abdollahian. In the video, a woman says, ‘I hope the report of his demise becomes true.’ #Iran #BreakingNews” pic.twitter.com/FJUk7Yp0EZ
— Masih Alinejad 🏳️ (@AlinejadMasih) May 19, 2024
म्हणून सेलिब्रेशन
2021 मध्ये इराणमध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक वादग्रस्त ठरली होती. त्यातून इब्राहिम रईसी पुन्हा राष्ट्रपती पदावर विराजमान झाले. रईसी कट्टरपंथी विचारधारेच प्रतिनिधीत्व करायचे. सुप्रीम लीडर खामेनेई यांचे ते निकटवर्तीय होते. असहमती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य चिरडणं, महिलांच्या कपड्यांवर प्रतिबंध, कठोर ‘हिजाब कायदा’ लागू करण्यासाठी इब्राहिम रईसी यांना जबाबदार धरलं जातं.
Just a few months ago, Ebrahim Raisi executed her son, Now, she’s dancing over his death in a helicopter crash.
I told you Iranian women are wounded, but unbowed to their oppressors.
My social media is flooded with videos of the family members of those killed by the President of… pic.twitter.com/y2PR1XkGGx— Masih Alinejad 🏳️ (@AlinejadMasih) May 20, 2024
इराणी सरकारसमोरच ते सर्वात मोठं आव्हान होतं
2022 मध्ये महसा अमिनी या मुलीचा पोलीस तुरुंगात मृत्यू झाल्यानंतर हिजाब कायदा आणि कठोर इस्लामी कायद्यांविरोधात इराणमध्ये धार्मिक राजवटी विरोधात देशभर विरोध प्रदर्शन सुरु झालं. अमिनीने हिजाब परिधान केला नव्हता, म्हणून पोलिसांनी तिला अटक केलेली. अमिनीच्या मृत्यूनंतर देशभरात लोक रस्त्यावर उतरलेले. 1979 सालच्या इराणी क्रांतीनंतर इराणमध्ये झालेलं हे सर्वात मोठं विरोध प्रदर्शन आहे. दोन वर्षापूर्वीच हे आंदोलन इब्राहिम रईसी सरकारसमोरच सर्वात मोठं आव्हान होतं.