शेजारच्या पाकिस्तानची आर्थिक स्थिती खूप खराब आहे. लोकांकडे खायला पैसे नाहीयत. सरकार कर्जाच्या ओझ्याखाली दबलं आहे. आता पाकिस्तान सरकारसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे. पाकिस्तानी संसदेत उंदरांनी दहशत निर्माण केलीय. पाकिस्तानी संसद उंदरांमुळे त्रस्त आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी सरकारने एक पाऊल उचललय. पाकिस्तानी संसद उंदरांना संपवण्यासाठी मांजरांची नियुक्ती करणार आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रीय सभेने या योजनेसाठी बजेटमध्ये 12 लाख रुपयांची तरतूद केली आहे. या योजनेनुसार विशेष प्रशिक्षित मांजरांना संसद परिसरात ठेवण्यात येईल. उंदीर पकडून त्यांना मारणं हेच त्यांचं एकमेव काम असेल. पाकिस्तानच्या संसदेत उंदरांची संख्या इतकी वाढली आहे की, त्यामुळे कामकाज प्रभावित होतय. उंदरांमुळे पाकिस्तानी संसदेत काही महत्त्वाच्या कागदपत्रांच नुकसान झालय.
ही गमतीशीर योजना नाही, तर…
मांजराच्या तैनातीमुळे फक्त उंदरांच्या समस्येपासूनच सुटका होणार नाही, तर ही एक नैसर्गिक आणि पर्यावरणाला अनुकूल पद्धत आहे. मांजरांना उंदरांना पकडून संपवण्याच ट्रेनिंग दिली जाईल. त्यांना संसद परिसरात ठेवलं जाईल. ही योजना अनेकांना गमतीशीर वाटत आहे. पण एका गंभीर समस्येवर हा उपाय आहे.
तात्काळ तोडगा आवश्यक
पाकिस्तानी संसदेत उंदरांची समस्या याआधी सुद्धा होती. पण आता हा प्रॉब्लेम इतका वाढलाय की, त्यावर तात्काळ तोडगा आवश्यक आहे. मांजर तैनातीची योजना लवकरच सुरु होईल अशी अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांच्या मते ही एक प्रभावी उपायोजना आहे.