दक्षिण कोरियाचे अयोध्येसोबत काय आहे खास कनेक्शन, राम मंदिराला भेट देण्यासाठी उत्सूक

| Updated on: Feb 06, 2024 | 10:29 PM

South Korea Ayodhya Relation: भारतात सध्या सगळीकडे राम मंदिराची चर्चा आहे. ५०० वर्षानंतर रामलल्ला विराजमान झाल्याने सगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे. पण तुम्हाला माहितीये की, की दक्षिण कोरियातील लोकं देखील अयोध्येत येण्यासाठी उत्सूक आहे. अयोध्येशी त्यांचं काय आहे खास कनेक्शन जाणून घ्या.

दक्षिण कोरियाचे अयोध्येसोबत काय आहे खास कनेक्शन, राम मंदिराला भेट देण्यासाठी उत्सूक
Follow us on

Ayodhya : दक्षिण कोरियातील सुमारे ६० लाखाहून अधिक लोक अयोध्येला माहेरघर मानतात. ही गोष्ट खूपच कमी लोकांना माहित असेल. हे लोकं अयोध्येतील राजकुमारी सुरीरत्नाचे वंशज असल्याचे ते मानतात, ज्यांनी 48 मध्ये कोरियाचा राजा किम सुरोशी विवाह केला होता. 22 जानेवारीला अयोध्येत राम लल्लाचा विराजमान झाले तो सोहळा दक्षिण कोरियातही मोठ्या उत्सुकतेने लोकांनी पाहिला.

कोरियन पौराणिक कथांनुसार, सुमारे 2,000 वर्षांपूर्वी, अयोध्येतील राजकुमारी सुरीरत्नाने 4,500 किलोमीटरचा प्रवास करून कोरियाला जावून गया साम्राज्याची स्थापना करणारा राजा किम सुरोशी विवाह केला होता. हे नाते आजही कोरिया आणि भारत यांच्यातील मजबूत सांस्कृतिक आणि धार्मिक संबंधांचा आधार आहे.

दक्षिण कोरियातील “करक” समुदायातील लोक, जे स्वतःला सुरीरत्नचे वंशज मानतात, ते दरवर्षी अयोध्येला भेट देतात आणि राणी हेओ ह्वांग ओके यांच्या स्मारकाला श्रद्धांजली अर्पण करतात. सरयू नदीच्या काठावर उत्तर प्रदेश सरकार आणि दक्षिण कोरिया सरकार यांच्या परस्पर सहकार्याने 2001 मध्ये या स्मारकाची स्थापना करण्यात आली. पुढील महिन्यात आपल्या देशातील इतर 22 जणांसोबत अयोध्येला भेट देण्याची योजना आखत असलेले यू जिन ली म्हणाले, “आम्ही दरवर्षी अयोध्येला स्मारकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी जातो आणि यावेळी आम्ही नवीन राम मंदिराला भेट देण्याचाही विचार करत आहोत.

“अयोध्या आमच्यासाठी खूप खास आहे, कारण आम्ही ते आमच्या आजीचे घर म्हणून पाहतो. नव्याने बांधलेले राम मंदिर पाहण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत.” भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध दृढ करण्यासाठी काम करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी सांगितले.

किम चिल-सू म्हणाले, “आमचा विश्वास आहे की अयोध्या आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंध हे विशेष नाते आहे. दोन्ही देशांमधील सांस्कृतिक आणि धार्मिक संबंध दृढ करण्यासाठी आम्हाला काम करायचे आहे.” नव्याने बांधलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनानंतर हे कोरिया पर्यटकांसाठीही आकर्षणाचे मोठे केंद्र बनेल, असे ते म्हणाले.