कोलंबो: श्रीलंकेला (Sri Lanka crisis) आर्थिक संकटाने घेरल्याने येथील नागरिकांचा अखेर संयम सुटलं आहे. एकाचवेळी हजारो लोकांनी राष्ट्रपती भवनाला घेरावा घातला. त्यामुळे श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना पळ काढावा लागला आहे. या आंदोलकांनी त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासाकडे चाल करून पंतप्रधानांचे निवासच पेटवून दिले. त्यामुळे श्रीलंकेत (Sri Lanka) एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण जनताच रस्त्यावर उतरल्याने लष्करानेही हात टेकले आहेत. हजारो लोकांनी तर केवळ राष्ट्रपती भवनाला (Sri Lanka President House) घेरावच घातला नाही तर राष्ट्रपती भवनात थेट घुसखोरी केली. अनेकांनी राष्ट्रपती भवनात घुसून धुडगूस घातला. त्यानंतर आता महिंदा अबेवर्धना (Mahinda Abeywardana) हे श्रीलंकेचे कार्यकारी राष्ट्रपती होऊ शकतात. अशी चर्चा सध्या आंतरष्ट्रीय स्तरावर आहे. त्यामुळे श्रीलंकेला लवकरच नवे कार्यवाहक राष्ट्रपती मिळू शकतात.
श्रीलंकेला आर्थिक संकटाने घेरल्याने येथील नागरिकांचा अखेर संयम सुटलं आहे. एकाचवेळी हजारो लोकांनी राष्ट्रपती भवनाला घेरावा घातला. त्यामुळे श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना पळ काढावा लागला आहे. त्यानंतर आता महिंदा अबेवर्धना हे श्रीलंकेचे कार्यकारी राष्ट्रपती होऊ शकतात. अशी चर्चा सध्या आंतरष्ट्रीय स्तरावर आहे. त्यामुळे श्रीलंकेला लवकरच नवे कार्यवाहक राष्ट्रपती मिळू शकतात.
श्रीलंकेतील आर्थिक संकटाने आता भयानक रूप धारण केले आहे. श्रीलंकेत आंदोलकांचा रोष प्रचंड वाढला असून आता त्यांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे 5 जुलैपासून बेपत्ता आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे गोटाबाया सुटकेससह बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. तर पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या मालकीच्या घरावरही आंदोलकांनी हल्ला चढवला असून त्यांचे ते खासगी घरही जाळण्यात आले आहे.राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे हे जनतेच्या उठावानंतर राष्ट्रपती भवन सोडून पळून गेले आहेत. ते कुठे गेले याचा कुणालाच थांगपत्ता नाही. ते जहाजात बसून समुद्र मार्गे पळून गेल्याचं सांगण्यात येतं. ते कोलंबोत नसल्याचंही सांगितलं जात आहे.
श्रीलंकेच्या राज्यघटनेनुसार, राष्ट्रपतीने कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी राजीनामा दिल्यास, संसद आपल्या कोणत्याही सदस्याला राष्ट्रपती म्हणून नियुक्त करू शकते असं श्रीलंकेच्या संविधानामध्ये म्हटले आहे. त्यामुळे नवीन अध्यक्ष उर्वरित कार्यकाळासाठी पदावर राहू शकतात. राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर एक महिन्याच्या आत नवीन राष्ट्रपती निवडला जाणे अपेक्षित आहे. तर 13 जुलै रोजी गोटाबाया यांनी राजीनामा दिल्यास श्रीलंकेला 13 ऑगस्टपर्यंत नवीन राष्ट्रपती पदावर नेमणूक करावी लागणार आहे.
राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर तीन दिवसांत संसदेची बैठक बोलवली जाते. त्यानंतर बैठकीत संसदेचे महासचिवांकडून राष्ट्रपतींच्या राजीनाम्याची माहिती संसदेला दिली जाते. अध्यक्षपदासाठी एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास, नवीन राष्ट्रपती गुप्त मतदानाद्वारे म्हणजेच पूर्ण बहुमताने निवडला जातो.