नवी दिल्लीः श्रीलंकेची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे, आणि दुसरीकडे पंतप्रधान राजपक्षेंची सून आणि इतर परिवारातल्या सदस्यांनी देशातून पलायन केल्याचं वृत्त आहे. त्यामुळे श्रीलंकेतील (Sri Lanka) परिस्थिती नेमकी काय आहे त्याचा टीव्ही नाईन मराठीचा हा एक ग्राऊंड रिपोर्ट. परं घर का भेदी, लंका ढाये ही म्हण सध्याच्या श्रीलंकेतल्या अवस्थेला लागू पडते आहे. कारण, एकीकडे देश बेहाल होत आहे, अनेक लोकं रस्त्यांवर उतरले आहेत आणि दुसरीकडे श्रीलंकेचे सर्वेसर्वा राजपक्षें (Rajapakshe) परिवाराच्या सुनांनी मुला-बाळांसह देश सोडल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
डेली मिररने दिलेल्या वृत्तानुसार पंतप्रधान महिंद्रा राजपक्षेंची सून लमिनी राजपक्षेनं यांनी देश सोडला आहे. आणि तिच्यासोबत राजपक्षे कुटुंबातले अन्य सदस्य 9 जणांनीही श्रीलंकेबाहेर पडल्याचे वृत्त देण्यात आले आहे. श्रीलंकेतील राजपेक्षेंच्या घराण्याची ही बातमी पहिल्यांदा गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र ही बातमी ज्या प्रकारे बाहेर आली तस तसे श्रीलंकेच्या लोकांमधील संतपाला पारा उराला नाही.
राजपक्षे परिवाराने देश सोडला असे वृत्त देण्यात आले असले तरी त्यांच्या घरातील सदस्य नेमके कोणत्या देशात गेले आहेत याची माहिती मात्र अजूनपर्यंत उपलब्ध होऊ शकली नाही. राजपक्षेंच्या घराण्याची परिस्थिती ही एकीकडे असतानाच दुसरीकडे मात्र राजपक्षे परिवाराने श्रीलंकन लोक घराबाहेर पडू नयेत, म्हणून आणीबाणी लागू केली आहे.
श्रीलंकेतील सरकारच्या आणीबाणीविरोधात संताप रोज वाढत असून लोकांमधून प्रचंड नाराजी व्यक्त करणाऱ्या 56 लोकांना श्रीलंकेतील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र त्यांच्या जामिनासाठी तब्बल 600 वकील कोर्टात पोहोचले आहेत. त्यामुळे न्यायालयालाही 56 जणांपैकी 50 जणांना सोडावं लागलं आहे.
श्रीलंकन जनता आणीबाणी आणि सरकारची धोरणांना जनता जुमानणार नाही, असा संदेश श्रीलंकेतील वकिलांनी दिला आहे. त्याच बरोबर या श्रीलंकेन जनतेने संसदेबाहेर श्रीलंकन जनता सरकारची धोरणं आणि कर्फ्यूला जुमानणार नाही, हा संदेश वकिलांनी दिलाय. श्रीलंकेच्या संसदेबाहेर निदर्शनं केली आहेत. आणीबाणी जाहीर केल्यानंतर पेट्रोल पंपावर येथील प्रशासनाने सैन्य तैनात करण्यात आले आहे, आणि महाागाईमुळे हॉटेल-चहाची दुकानंही बंद पडली आहेत.
नेमकं श्रीलंकेत
माजी क्रिकेटपटू सनथ जयसूर्या यांनी सुद्धा राजपक्षे सरकाराविरोधात रस्त्यावर उतरला आहे. श्रीलंकन असणारी अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनंही श्रीलंकने जनतेला शांततेचं आवाहन केलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील अर्थकारण, कोरोना आणि बेसुमार कर्जामुळे श्रीलंकेचं अर्थकारण बिघडले आहे. अत्यावश्यक गोष्टी खरेदीसाठीही श्रीलंका सरकारकडे पैसा उरलेला नसून राजधानीसारख्या शहरांमध्ये 12-12 तास वीजकपात सुरु आहे. परिणामी कंपन्या आणि उद्योग बंद होऊ लागले आहेत.
संबंधित बातम्या
मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन पुणे मनसेत अंतर्गत वाद! वसंत मोरे नाराज, मनसे मात्र भूमिकेवर ठाम