Sri Lanka crisis : श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात सापडलं रोख दीड कोटीचं घबाड, आंदोलकांनी पैसे घेतले आणि…

| Updated on: Jul 10, 2022 | 10:34 AM

Sri Lanka crisis : आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात घुसून स्विमिंग पूलात पोहण्याचा आनंद घेतला. किचनमध्ये जाऊन पदार्थांवर येथेच्छ ताव मारला.

Sri Lanka crisis : श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात सापडलं रोख दीड कोटीचं घबाड, आंदोलकांनी पैसे घेतले आणि...
श्रीलंकेच्या राष्ट्रपती भवनात सापडलं रोख दीड कोटीचं घबाड, आंदोलकांनी पैसे घेतले आणि...
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोलंबो: श्रीलंकेला (Sri Lanka crisis) आर्थिक संकटाने घेरल्याने येथील नागरिकांचा अखेर संयम सुटल आहे. एकाचवेळी हजारो लोकांनी राष्ट्रपती भवनाला घेरावा घातला. त्यामुळे श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना पळ काढावा लागला आहे. या आंदोलकांनी त्यानंतर पंतप्रधानांच्या निवासाकडे चाल करून पंतप्रधानांचे निवासच पेटवून दिले. त्यामुळे श्रीलंकेत (Sri Lanka) एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण जनताच रस्त्यावर उतरल्याने लष्करानेही हात टेकले आहेत. हजारो लोकांनी तर केवळ राष्ट्रपती भवनाला (president house) घेरावच घातला नाही तर राष्ट्रपती भवनात थेट घुसखोरी केली. अनेकांनी राष्ट्रपती भवनात घुसून धुडगूस घातला. काहींना राष्ट्रपती भवनातील स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा मनसोक्त आनंद घेतला तर काहींनी थेट किचनमध्ये जाऊन खाद्यपदार्थांवर ताव मारला. यावेळी आंदोलकांना राष्ट्रपती भवनात रोख रकमेचा खजानाही सापडला. पण नागरिकांनी हा पैसा सुरक्षा रक्षकांकडे दिला.

 

हे सुद्धा वाचा

राष्ट्रपती भवनावर ताबा मिळवल्यानंतर आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात धुडगूस घातला. पण यावेळी आपला प्रामाणिकपणाही दाखवला. आंदोलकांना राष्ट्रपती भवनात 15 मिलियन म्हणजे जवळपास दीड कोटी रुपये सापडले. ही सर्व रोख रक्कम होती. बंडल पाहून आंदोलकांनी हा सर्व पैसा हातात घेतला आणि राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षा रक्षकांकडे सुपूर्द केला. त्यामुळे आंदोलकांच्या या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं जात आहे.

 

पियानोही वाजवले

आंदोलकांनी राष्ट्रपती भवनात घुसून स्विमिंग पूलात पोहण्याचा आनंद घेतला. किचनमध्ये जाऊन पदार्थांवर येथेच्छ ताव मारला. काहींनी तर राष्ट्रपती भवनात आपल्या पसंतीचे पदार्थ शिजवून खाल्ले. तर काही आंदोलक राष्ट्रपती भवनातील पियानोही वाजवताना दिसले.

गोटाबाया कुठे आहेत?

राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे हे जनतेच्या उठावानंतर राष्ट्रपती भवन सोडून पळून गेले आहेत. ते कुठे गेले याचा कुणालाच थांगपत्ता नाही. ते जहाजात बसून समुद्र मार्गे पळून गेल्याचं सांगण्यात येतं. ते कोलंबोत नसल्याचंही सांगितलं जात आहे.

पंतप्रधानांचे घर फुंकले

राष्ट्रपती भवनात धुडगूस घातल्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांच्या घरावर चाल केली. तसेच विक्रमसिंघे यांच्या घराला आग लावली. यापूर्वी सर्वपक्षीय सरकार बनवण्यासाठी विक्रमसिंघे यांनी राजीनामा देण्याची तयारीही दर्शवली होती. दरम्यान, श्रीलंकेत तणावाची स्थिती आहे. जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. मात्र, जमाव काही करता मागे हटताना दिसत नाही.