Starliner Landed: बोईंगने करुन दाखवलं, सुनीता विलियम्स अजूनही अवकाशात पण स्टारलायनर सुरक्षित पृथ्वीवर परतलं

| Updated on: Sep 07, 2024 | 12:01 PM

Starliner Landed: . सुनीता विलियम्स अजून अवकाशात अडकल्या आहेत. खरंतर त्या ज्या यानाने पृथ्वीवर परतणं अपेक्षित होतं. ते यान स्टारलायनर त्यांच्याविना सुरक्षित पृथ्वीवर उतरलं आहे. बोईंगवर अविश्वास दाखवण्यात आला होता. पण स्वत:ला सिद्ध करुन दाखवलय.

Starliner Landed: बोईंगने करुन दाखवलं, सुनीता विलियम्स अजूनही अवकाशात पण स्टारलायनर सुरक्षित पृथ्वीवर परतलं
Sunita William
Follow us on

भारतीय वंशाच्या अमेरिकी अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना अवकाशात घेऊन जाणारं स्टारलायनर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतलं आहे. बोईंगच स्टार लायनर अखेर तीन महिन्यांनी पृथ्वीवर परतलं आहे. आज 7 सप्टेंबरला सकाळी 9.31 मिनिटांनी न्यू मेक्सिकोच्या व्हाइट सँड्स स्पेस हार्बरमध्ये स्टारलायनर लँडिंग केलं. स्टारलायनरने सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अवकाश तळावर पोहोचवलं. पण नंतर त्यात तांत्रिक बिघाड झाला. स्टारलायनर पृथ्वीवर सुरक्षित परत येईल, असा NASA ला विश्वास नव्हता. त्यामुळे नासाने एलन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या क्रू 9 मिशनद्वारे सुनीता विलियम्स आणि विल्मोर यांना पृथ्वीवर आणण्याचा निर्णय घेतला. सुनीता विलियम्स आणि विल्मोर आठ दिवसांच्या मिशनसाठी ISS मध्ये गेले होते. पण स्टारलायनरमधल्या बिघाडामुळे तिथेच अडकून पडले.

सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर आता पुढच्यावर्षी फेब्रुवारी 2025 मध्ये पृथ्वीवर परत येतील. बोईंगने स्टारलायनर सुनीता विलियम्स आणि बूच विल्मोर यांना सुरक्षित पृथ्वीवर आणेल असा विश्वास व्यक्त केला होता. पण नासाला खात्री नव्हती. म्हणून त्यांनी सुनीता विलियम्स आणि बुच विल्मोर यांना दुसऱ्या मिशनमध्ये ट्रान्सफर केलं. पण अखेर बोईंगच स्टारलायनर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतण्यात यशस्वी ठरलं आहे. बोईंगसाठी स्टारलायनरच सुरक्षित परतण हा प्रतिष्ठेचा विषय बनला होता. कारण त्यावर कंपनीचा भविष्यातील स्पेसचा बिझनेस अवलंबून होता. ज्याबद्दल अनेकांच्या मनात संशय होता, भिती होती तसं काही घडलं नाही. स्टारलायनरने यशस्वीरित्या पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. बोईंगने आपला नावलौकीक सिद्घ करुन दाखवला आहे.

लँडिंगला किती मिनिट लागली?

स्टारलायनरने 8.58 मिनिटांनी डीऑर्बिट बर्न पूर्ण केलं. या बर्ननंतर जमिनीवर लँड होण्यासाठी 44 मिनिट लागली. लँडिग करताना वातावरणात हीटशिल्ड एक्टिव होतं. त्यानंतर ड्रोग पॅराशूट डिप्लॉय करण्यात आलं. म्हणजे दोन छोटे पॅराशूट. त्यानंतर तीन पॅराशूट तैनात करण्यात आले. बोइंग ही जगातील एक अग्रगण्य विमान निर्मिती कंपनी आहे. प्रवासी आणि फायटर दोन्ही विमान बनवण्याचा बोइंगकडे मोठा अनुभव आहेबोइंगने सतत थ्रस्टरची टेस्टिंग केली. डाटाच विश्लेषण केलं. स्टारलायनर सुरक्षितपणे दोन्ही अंतराळवीरांना घेऊन येईल असा विश्वास व्यक्त केला होता. पण NASA ने विश्वास दाखवला नाही.