लेबनानमध्ये हिजबुल्लाह सदस्यांच्या पेजर्समध्ये एकापाठोपाठ एक ब्लास्ट झाल्याने सगळ्या जगात खळबळ उडाली आहे. या पेजर ब्लास्टला तैवानी कंपनी गोल्ड अपोलोशी जोडलं जातय. कारण हिजबुल्लाहने तैवानच्या कंपनीला पेजरची ऑर्डर दिली होती. या स्फोटाच वृत्त समोर येताच तैवानी पोलीस गोल्ड अपोलो कंपनीच्या ऑफिसमध्ये पोहोचले. कंपनीचे फाऊंडर ह्सू चिंग-कुआंग यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, “हे पेजर आम्ही बनवलेले नव्हते’ मंगळवारी लेबनानमध्ये ज्या पेजरमध्ये बॉम्बस्फोट झाले, ते पेजर युरोपच्या एका कंपनीने बनवले होते. त्यांच्याकडे तैवानी कंपनीच ब्रँड नेम वापरण्याचा अधिकार आहे.
“आम्ही या मॉडलचे पेजर्स बनवण्याचा सबक्रॉन्ट्रॅक्ट युरोपच्या एका कंपनीला दिलय. पेजर्सचे काही भाग थर्ड पार्टीकडून येतात” असं तैवानी कंपनीने सांगितलं. “फक्त हिजबुल्लाहच नाही, आम्ही सुद्धा या हल्ल्याचे पीडित आहोत. कारण आम्हाला आमच्या जबाबदारीच भान आहे. आमच्यासाठी ही लज्जास्पद बाब आहे” असं कंपनीचे मालक ह्सू चिंग-कुआंग यांनी सांगितलं. इस्रायलला ठावठिकाणा कळू नये, या उद्देशाने हिजबुल्लाह फायटर्स हे पेजर्स वापरतात. पण इस्रायलने त्यांची ही टेक्निक त्यांच्याच विरोधात वापरली.
किती हजार पेजर्सची ऑर्डर दिलेली?
स्फोटात पेजर्सचे जे तुकडे झाले, त्याचं रॉयटर्स या न्यूज एजन्सीने विश्लेषण केलं. त्याच्या मागच्या बाजूला गोल्ड अपोलो कंपनीचे स्टिकर्स दिसतायत. तैवान स्थित गोल्ड अपोलो कंपनीला हिजबुल्लाहने 5,000 पेजर्सची ऑर्डर दिली होती, असं लेबनानच्या एका वरिष्ठ सुरक्षा सूत्राने रॉयटर्सला सांगितलं.
किती हजार नागरिक जखमी ?
मंगळवारी लेबनान आणि सीरियामधील हिजबुल्लाह फायटर्सच्या पेजरमध्ये बॉम्बस्फोटांची मालिका सुरु झाली. यात जवळपास 3 हजार हिजबुल्लाह फायटर आणि सर्वसामान्य नागरिक जखमी झाले. 11 जणांचा मृत्यू झाला. हिजबुल्लाहने यामागे इस्रायल असल्याचा दावा केलाय. इस्रायलने याबद्दल कोणतही स्टेटमेंट केलेलं नाही. अमेरिकेने हिजबुल्लाह आणि इराणला शांतता बाळगण्याच अपील केलं आहे.