तालिबानने अफगाणिस्तानात विदेशी चलनाच्या वापरावर (foreign currency ban) बंदी घातली आहे. ऑगस्टमध्ये तालिबानने देशाचा ताबा घेतल्यानंतर, बऱ्याच देशांनी आर्थिक मदत बंद केल्याने अफगाणिस्तानातची अर्थव्यवस्था आधिच संकटात आहे. आशा परिस्थितीत विदेशी चलनावर बंदी लावल्याने अफगाणिस्तानातची आर्थिक संकट अजून गंभीर होऊ शकते. “देशातील आर्थिक परिस्थिती आणि राष्ट्रीय हितासाठी सर्व अफगाणांनी प्रत्येक व्यवहारात अफगाणी चलन वापरणे आवश्यक आहे,” तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले. अफगाणिस्तामध्ये बहुतेक व्यवहार हे डॉलर्समध्ये होतात आणि पाकिस्तानच्या सिमेवरील शहरांमध्ये रूपयामध्ये व्यवहार होतात. (Taliban bans foreign currency in Afghanistan economy in trouble)
Taliban ban use of foreign currency in Afghanistan -spokesman https://t.co/ukZ9f1kMNu pic.twitter.com/ComaDavs4G
— Reuters (@Reuters) November 2, 2021
इस्लामिक अमिरातीत सर्व नागरिक, दुकानदार, व्यापारी आणि सामान्य जनतेला यापुढे सर्व व्यवहार अफगाणी चलनाने करण्याचे आणि परदेशी चलन वापरण्यास बंदी करण्याचे निर्देश देते,” तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले. या आदेशाचे कोणीही उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे निवेदनात म्हटले आहे.
ऑगस्टमध्ये तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर, यूएस फेडरल रिझर्व्ह आणि युरोपमधील केंद्रीय बँकांनी देशाच्या अब्जावधी डॉलर्सची विदेशी मालमत्ता फ्रीज केली होती. देशातील आर्थिक परिस्थिती आणि राष्ट्रीय हितासाठी सर्व अफगाणांनी प्रत्येक व्यवहारात अफगाणी चलन वापरणे आवश्यक आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी भारत NSA म्हणजेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या स्तरावरील बैठकीचं आयोजन करणार आहे. ऑगस्ट महिन्यात तालिबानने अफगाणिस्तानवर ताबा मिळवला. अश्रफ गनी देश सोडून पळून गेले, आधीचं सरकार कोसळलं. त्यानंतर अख्ख्या जगाने अफगाणिस्तानला दिली जाणारी मदत थांबवली. त्यातच अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था आता पूर्णपणे मोडकळीस आली आहे.
Other News