अफगाणिस्तानमध्ये बंदुका आणि रॉकेट घेऊन तालिबान्यांची खुलेआम दहशत, धडकी भरवणारी दृश्ये
अफगाणिस्तानच्या एका मोठ्या भागावर आता तालिबानचा ताबा आहे. देशातील ग्रामीण आणि डोंगराळ भागात दबा धरुन बसलेलं तालिबान आता अफगाणिस्तानच्या शहरांवरही कब्जा करत आहे.
1 / 10
अफगाणिस्तानच्या एका मोठ्या भागावर आता तालिबानचा ताबा आहे. देशातील ग्रामीण आणि डोंगराळ भागात दबा धरुन बसलेलं तालिबान आता अफगाणिस्तानच्या शहरांवरही कब्जा करत आहे.
2 / 10
अफगाणिस्तानमधील 12 पेक्षा अधिक प्रांतिय राजधान्यांवर तालिबानचं नियंत्रण आहे. या सर्व ठिकाणी खुलेआम तालिबानी कट्टरतवादी हातात बंदुका आणि रॉकेट घेऊन फिरत आहेत.
3 / 10
हातात शस्त्रास्त्र घेऊन फिरणाऱ्या तालिबान्यांनी या भागात प्रचंड दहशत निर्माण केलीय (Taliban Afghanistan Control). तालिबानी पोलिसांच्या गाड्यांवर चढून तोडफोड करत आहेत.
4 / 10
अफगाणिस्तानच्या दक्षिण उरुजगान प्रांतातील 2 खासदारांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक अधिकाऱ्यांनी प्रांतीय राजधानीला वेगाने पुढे जाणाऱ्या तालिबान्यांच्या ताब्यात दिलंय.
5 / 10
अमेरिकेने अफगाणमधील उर्वरित सैन्य मागे बोलावल्यानंतर काही काळातच तालिबानने दोन तृतीयांश भागावर नियंत्रण केलंय.
6 / 10
आता अफगाणिस्तानच्या सरकारकडे केवळ राजधानी काबुल आणि देशाचा उर्वरित भाग आहे.
7 / 10
अफगाण सरकारने पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआए आणि पाकिस्तानी सैन्यावर तालिबानला शस्त्रास्त्र पुरवण्याचा आरोप केलाय (Pakistan Helps Taliban).
8 / 10
यानंतर अफगाणिस्तानने पाकिस्तान विरोधात निर्बंध लावण्याची मागणी केलीय. पाकिस्तानने मात्र हे आरोप फेटाळले आहेत.
9 / 10
अमेरिकन सैन्याची संपूर्ण वापसी तालिबान आपल्या विजयाचा भाग म्हणून साजरा करत आहे.
10 / 10
रॉकेट लाँचरसह तालिबानी.