Terrorist Attack | मियांवाली ट्रेनिंग एअरबेसनंतर पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी हल्ला

| Updated on: Nov 07, 2023 | 10:20 AM

Terrorist Attack In Pakistan | पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्याच सत्र सुरुच आहे. पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी हल्ला झालाय. मागच्या शनिवारी मियांवाली ट्रेनिंग एअरबेसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात काही फायटर विमान जाळण्यात आली होती.

Terrorist Attack | मियांवाली ट्रेनिंग एअरबेसनंतर पाकिस्तानात आणखी एक दहशतवादी हल्ला
terrorist
Follow us on

लाहोर : पाकिस्तानात एकापाठोपाठ एक दहशतवादी हल्ले सुरुच आहेत. तिथे दहशतवादी हल्ल्याच सत्र थांबलेलं नाहीय. खैबर पख्तूनख्वाच्या खैबर जिल्ह्यातील तिराह भागात पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. यात पाकिस्तानच्या सैन्य अधिकाऱ्यासह तीन सैनिक ठार झाले. पाकिस्तानी सैन्याचं मीडिया विंग इंटर-सर्विसेज पब्लिक रिलेशन्सने (ISPR) एक स्टेटमेंट जारी केलय. एका ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानी सैन्याचे लेफ्टनंट कर्नल मोहम्मद हसन हैदर यांच्यासह तीन सैनिक मारले गेले. पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईत तीन दहशतवादी मारले गेले. तीन अन्य दहशतवादी जखमी झालेत. ऑपरेशन दरम्यान पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना घेरलं होतं. त्यानंतर चकमक सुरु झाली.

पाकिस्तानी सैन्याचे अंतरिम पंतप्रधान अनवारुल हक काकर यांनी तीन सैनिकांचा मृत्यू झाल्याबद्दल दु:ख व्यक्त केलं. पाकिस्तानातून दहशतवादचा समूळ नायनाट करेपर्यंत हे युद्ध सुरु राहील असं अनवारुल हक काकर यांनी म्हटलय. पाकिस्तानी सैन्य दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी प्रतिबद्ध आहे. दहशतवादच पाकिस्तानातून समूळ उच्चाटन होत नाही, तो पर्यंत हे युद्ध सुरु ठेवण्याची काकर यांनी शपथ घेतलीय. दहशतवाद्यांनी कधीही त्यांच्या उद्देशात यशस्वी होऊ देणार नाही.

तहरीक-ए-जिहादने स्वीकारलेली जबाबदारी

मागच्या शुक्रवारी बलूचिस्तानच्या ग्वादर जिल्ह्यात ओरमारा भागात सुरक्षा पथकाच्या दोन वाहनांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात 17 पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. त्यानंतर शनिवारी पाकिस्तानी एअर फोर्सच्या मियांवाली ट्रेनिंग एयर बेसवर हल्ला झाला होता. यावेळी पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईत 9 दहशतवादी मारले गेले. काही फायटर विमान नष्ट झाली. तहरीक-ए-जिहाद पाकिस्तानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.