जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, टेस्ला आणि SpaceX चा CEO इलॉन मस्क नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. मात्र, यावेळी बड्या अमेरिकन नेत्याला लिहिलेल्या एका वाक्यामूळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहेत. जगभरातून त्याच्यावर टीका केली जातेय. त्याला अमानवी, उद्धट असल्याचं म्हटलं जातंय.
वरिष्ठ सिनेटर बर्नी सँडर्स, जे राष्ट्रपती पदाचे माजी उमेदवारही आहेत, त्यांनी ‘अतिश्रीमंतांनी त्यांच्या वाट्याला आलेला योग्य कर भरावा,’ असे ट्विट केले होते. याच्यावर मस्कने रिट्विट केलंय, “मी विसरतो की तुम्ही अजूनही जिवंत आहात.”असं मस्कने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय.
मस्क इथेच थांबला नाही, एका कमेंटला उत्तर देताना त्याने पुन्हा सँडर्स यांना टेस्ला स्टॉकची अधिक विक्री करण्याची ऑफर दिली. “बर्नी, मी आणखी स्टॉक विकू? फक्त म्हणा…”, असं त्याने ट्विट केलं.
I keep forgetting that you’re still alive
— Elon Musk (@elonmusk) November 14, 2021
Want me to sell more stock, Bernie? Just say the word …
— Elon Musk (@elonmusk) November 14, 2021
शनिवारी झालेल्या या ट्वीटर युद्धामुळे मस्कवर तीव्र टीका तर झालीच, पण त्याच्या कंपनीचे मोठे आर्थिक नुकसानही झाले. सोमवारी टेस्लाचा स्टॉक जवळपास 2 टक्क्यांनी घसरला आणि कंपनीचे बाजार भांडवल सुमारे 207 अब्ज डॉलर्सने कमी झाले.
इलॉन मस्कने गेल्या आठवड्यात टेस्लाचे सुमारे 7 अब्ज डॉलर्सचे शेअर्स विकले आहेत. गेल्या महिन्यात मस्कने अब्जाधीशांच्या नफ्यावर बिडेन प्रशासनाने प्रस्तावित कराराला विरोध केला होता. त्याने ट्वीट केले की, “अखेर, त्यांच्याकडे लोकांचे पैसे संपतात आणि मग ते तुमच्याकडे येतात.” तसेच मस्कने जाहीर केले की टेस्ला आपले मुख्यालय कॅलिफोर्नियाहून टेक्सासमध्ये हलवणार आहे, जीथे राज्याचा आयकर नाही.
इतर बातम्या-