अमेरिकेत टेक्सास येथे ह्यूस्टनमधील लोकप्रिय अॅस्ट्रोव्हर्ल्ड फेस्टिवल मध्ये (Astroworld Music Festival) एका अपघातात किमान आठ लोकांचा मृत्यू झाला आणि जवळपास 300 लोक जखमी झाले आहेत. अमेरिकन रॅपर ट्रॅव्हिस स्कॉटच्या (rapper Travis Scott) याच्या कॉन्सर्टमध्ये 50,000 चाहत्यांनी भाग घेतला होता. याच कॉन्सर्टला सुरूवात होताना हा अपघात झाला आणि या कॉन्सर्टला ताबडतोब रद्द करावे लागले. शुक्रवारी रात्री सुमारे 9 वाजता (स्थानिक वेळ) ही घटना घडली. (texas huoston rmusic festival fire 8 dead many injured)
#UPDATE At least eight people died and several were wounded in a crush at the #Astroworld music festival in the southern US state of Texas on Friday night, authorities say https://t.co/Nqv0eyc5ru
? file pic shows the stage at the Astroworld Festival in Houston, Texas in 2019 pic.twitter.com/91nuszOmgi
— AFP News Agency (@AFP) November 6, 2021
स्टेजच्या समोर लोकांची प्रचंड गर्दी झाली आणि लोकांमध्या भिती पसरली होती. काही लोकांनी पोर्टेबल शौचालयांवर चढायला सुरुवात केली. सुरक्षा कर्मचार्यांनी गर्दी नियंत्रणात आणच्याचा प्रयत्न करत होते मात्र गोंधळ अनावर झाला होता. ह्यूस्टन फायर अध्यक्ष सॅम पेनाने सांगितले की, “अनेक लोक जखमी झाले आहेत. स्टेज समोर लोक एकत्रीत होऊन गर्दी सुरू झाली. 17 रुग्णांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जवळच्या फील्ड हॉस्पिटलमध्ये 300 हून अधिक लोकांना उपचार देण्यात आले”, पेन म्हणाला.
गर्दीमध्ये तपासणी करणार्या मेटल डिटेक्टरकडे सुरक्षा रक्षकांनी दुर्लक्ष केले, असं सांगण्यात येत आहे.
Other News