Israel-Hamas War | ते डायरेक्ट काळ बनून येतात, लादेनला त्यांनीच संपवलं, आता गाझापट्टीत आली ‘डेल्टा फोर्स’

| Updated on: Oct 21, 2023 | 4:07 PM

Israel-Hamas War | ओसामा बिन लादेनचा खात्मा याच अमेरिकेच्या 'डेल्टा फोर्स' ने केला. युद्धात, किती डेंजरस आहे हे युनिट जाणून घ्या. एका फोटोमुळे सगळी गफलत झाली आणि त्यांच्या येण्याची बातमी बाहेर फुटली. 'डेल्टा फोर्स' आली म्हणजे शत्रूचा कर्दनकाळ आला.

Israel-Hamas War | ते डायरेक्ट काळ बनून येतात, लादेनला त्यांनीच संपवलं, आता गाझापट्टीत आली डेल्टा फोर्स
Delta Force
Follow us on

वॉशिंग्टन : इस्रायल-हमास युद्धात अमेरिकन सैन्याची एक घातक तुकडी सहभागी होत आहे. या सैन्य तुकडीत युद्धाच पारड फिरवण्याची ताकत आहे. अमेरिकेच्या या घातक कमांडो फोर्सने एकापेक्षाएक धोकादायक ऑपरेशन्स यशस्वीपणे पार पडले आहेत. गाझा पट्टीत इस्रायलच्या मदतीला डोल्टा फोर्स आली आहे. अमेरिकेचे विशेष ट्रेन कमांडो या फोर्समध्ये आहेत. ते शत्रूचा काळ बनून येतात. त्यामुळे त्यांच्यापासून हमासच्या दहशतवाद्यांचा बचाव अशक्य आहे. स्पेशल ऑपरेशन्समध्ये माहिर असलेल हे युनिट अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे.

1) डेल्टा फोर्स अधिकृतपणे 1st स्पेशल फोर्सेस ऑपरेशनल डिटॅचमेंट-डेल्टा (1st SFOD-D) नावाने ओळखली जाते. दहशतवाद विरोधी मिशनची जबाबदारी डेल्टा फोर्सवर असते. बंधकांची सुटका आणि दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशनमध्ये ही फोर्स सहभागी होते.

2) डेल्टा फोर्स संभाव्य धोका आणि हाय-प्रोफाइल टार्गेटची गोपनीय माहिती मिळवण्यासाठी टेहळणी मिशन्स राबवते. डेल्टा फोर्स आंतरराष्ट्रीय पातळीवर बंधकांच्या सुटकेसाठी चालवल्या जाणाऱ्या ऑपरेशन्समध्ये माहीर आहे. जगभरात दहशतवादाचा धोका वाढत असताना 1977 साली कर्नल चार्ल्स बेकविथ यांनी डेल्टा फोर्सची सुरुवात केली.

3) डेल्टा फोर्सने ऑपरेशन ईगल क्लॉ, ऑपरेशन अर्जेंट फ्यूरी, ऑपरेशन जस्ट कॉज आणि ऑपरेशन गॉथिक सर्पेंट सारखे मोठे मिशन्स पार पडले आहेत. डेल्टा फोर्सने खाडी युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली होती. डेल्टा फोर्स ऑपरेशन कायला मुलरमध्ये सहभागी होती.

4) अफगानिस्तानात तालिबान, लीबियामध्ये बेंगाजी हल्लेखोर आणि आखाती देशात इराकी सैन्याला पळवून लावण्यात डेल्टा सैनिकांचा महत्त्वाचा रोल होता. त्याशिवाय पनामा संकटात 35000 अमेरिकन्सना पनामामतून सुरक्षित बाहेर काढलं होतं. कुवैतवर इराकने हल्ला केला, त्यावेळी डेल्टा फोर्सचा रोल महत्त्वाचा होता. अमेरिकेने सद्दाम हुसैनचा पाडाव केला होता.

5) डेल्टा फोर्सने सीरियात रेड टाकून मोस्ट वॉटेड दहशतवादी अबू बकर अल-बगदादीला संपवलं होतं. बॅटल ऑफ टोरा बोरा नावाने प्रसिद्ध असलेल्या लढाईत डेल्टा फोर्सने अमेरिकेचा नंबर 1 शत्रू ओसामा बिन लादेनला संपवलं होतं. त्याशिवाय सद्दाम हुसैनला शोधून पकडण्यात डेल्टा सैनिकांची महत्त्वाची भूमिका होती.