भारतविरोधी भूमिका मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना पडले भारी, देशातीलच खासदारांनी केलं बायकॉट

| Updated on: Feb 05, 2024 | 8:16 PM

India vs maldive : भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या मालदीवच्या नव्या राष्ट्राध्यक्षांना पहिल्याच भाषणात झटका लागला आहे. भारत विरोधी भूमिका घेत असल्याने त्यांच्याच देशातील खासदारांनी त्यांना बायकॉट केले आहे. आज पहिल्या भाषणात बोलताना देखील त्यांचा भारत विरोधी सूर दिसून येत होता.

भारतविरोधी भूमिका मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांना पडले भारी, देशातीलच खासदारांनी केलं बायकॉट
Follow us on

India maldive row : मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांना देशात माघारी बोलवण्याची आज घोषणा केली आहे. आज मालदीवच्या संसदेत त्यांनी पहिले भाषण केले. या दरम्यान त्यांचा भारत विरोधी मूड दिसत होता. यादरम्यान विरोधी पक्षांनी राष्ट्राध्यक्षांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला. त्यामुळे यावेळी फक्त 24 खासदार उपस्थित होते. एकूण 56 खासदारांनी या भाषणावर बहिष्कार टाकला.

मालदीवमधील विरोधी पक्षाने राष्ट्रपतींच्या भाषणावर बहिष्कार टाकल्यानंतर त्यांनी भारतीय सैनिकांना त्यांच्या देशात परतण्याची घोषणा केली आहे.

56 खासदारांचा बहिष्कार

विरोधी मालदीवियन डेमोक्रॅटिक पार्टी (MDP) आणि डेमोक्रॅट्सने सरकारच्या अलोकतांत्रिक पद्धतीमुळे संसदेवर बहिष्कार टाकण्याचा विरोधकांनी निर्णय घेतला. एकूण 56 खासदारांनी राष्ट्राध्यक्षांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकला. यामध्ये डेमोक्रॅट पक्षाचे 13 आणि एमडीपीच्या 44 खासदारांचा समावेश आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सकाळी 9 वाजता जेव्हा सत्र सुरु झाले तेव्हा फक्त 24 खासदार उपस्थित होते.

राष्ट्रपतींच्या भाषणावर बहिष्कार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विरोधक खासदारांनी राष्ट्राध्यक्षांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्याविरोधात खासदारांनी अविश्वास प्रस्ताव मांडल्याचे सांगण्यात येत आहे.

मालदीवच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने एक्सवर एक पोस्ट केली होती. ते म्हणाले की मालदीव संसदेच्या सत्रात राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू आणि प्रथम महिला उपस्थित होत्या. वृत्तानुसार, राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात सांगितले की, देशाची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता वरिष्ठ राजकीय पदांवर अधिक लोकांना नियुक्त न करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालदीवमध्ये नुकतंच नवीन सरकार स्थापन झाले आहे. राष्ट्राध्यक्ष मुइज्जू हे चीन समर्थक आहेत. त्यामुळे त्यांना चीनकडून अधिक फायद्याची आशा आहे. भारत विरोधी भूमिका घेत त्यांनी भारतासोबतचा करार देखील रद्द केला आहे. मालदीवमध्ये असलेले भारतीय सैन्य देखील माघारी बोलवण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

मालदीवच्या भूमीवर परकीय देशाचं सैन्य हे आमच्या सार्वभौमत्वाला योग्य नसल्याचं त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे त्यांनी सैन्य माघारी बोलवण्यासाठी भारताला अल्टिमेटम दिले होते. भारतीय सैन्य तेथे भारताने भेट दिलेल्या हेलिकॉप्टर आणि विमानाचं संचलन तसेच देखरेख करण्यासाठी तैनात करण्यात आलं आहे.