नवी दिल्ली : 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता भारतात मोठी आर्थिक घडामोड घडली होती. देशातील प्रत्येक जण त्याच्या चष्म्यातून या घटनेची नोंद करतो. कोणी हा तुघलकी निर्णय मानतो. तर कोणाला ही काळ्या पैशाविरोधातील केलेली धडक कारवाई वाटते, आता नोटबंदीची (Demonetization) आवाज घुमू लागला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रात्री 8 वाजता अचानक येऊन नोटबंदीची घोषणा केली. 500 आणि 1,000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला होता. त्याची मध्यरात्रीपासून अंमलबजावणी ही झाली. प्रत्येक जण त्याच्या चष्म्यातून या घटनेची नोंद करतो. कोणी हा तुघलकी निर्णय मानतो. तर कोणाला ही काळ्या पैशाविरोधातील केलेली धडक कारवाई वाटते, आता नोटबंदीची आवाज घुमू लागला आहे.
आम्हाला हवी नोटबंदी
आर्थिक संकटाशी सामना करणाऱ्या पाकिस्तानमधील (Pakistan Economic Crisis) जनतेला आता नोटबंदी हवी आहे. मोदी सरकारच्या नोटबंदीची भूरळ तिथल्या जनेतला पडली आहे. पाकिस्तानी अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक स्थितीतून जात आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्था डामाडौल झाल्याने जनतेवर कराचा मोठा भार पडला आहे. आता जनताच नाही तर पाकिस्तानमधील अर्थतज्ज्ञांनी सुद्धा देशात नोटबंदीची मागणी केली आहे. नोटबंदीची मागणी जोर धरु लागली आहे.
या नोटेवर मोठा रोष
बिझनेस टुडेने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, पाकिस्तानमधील अर्थतज्ज्ञ अम्मार खान (Ammar Khan) यांनी सल्ला दिला आहे. त्यात पाकिस्तानला आर्थिक संकटातून बाहेर काढायचे असेल तर पाकिस्तानमधील 5,000 रुपयांची नोट बंद करण्याची वकिली करण्यात आली आहे. सध्या पाकिस्तानमधील ही सर्वाधिक मूल्य असलेली नोट आहे. देशातील नागरिकांना मोदींच्या करन्सी स्ट्राईकची आठवण येत आहे. त्यांना पाकिस्तानमध्ये पण नोटबंदी हवी आहे.
मोदींची जादू
पाकिस्तानमधील नागरिकांमध्ये मोदींची जादू वाढत आहे. अनेक युट्यूबर आता खुलेपणाने मोदीच्या नोटबंदीचे कौतूक करत आहेत. नोटबंदीचा प्रयोग आणि जीएसटी, तसेच आयकर नियमात केलेल्या बदलाची मोठी चर्चा पाकिस्तानी मीडियात रंगली आहे. मोदींनी केलेल्या नोटबंदी प्रमाणेच देशात पण नोटबंदी करण्याची मागणी पाकिस्तान नागरिक आणि अर्थतज्ज्ञांनी लावून धरली आहे.
काळेधन वाढले
पाकिस्तानी नागरिकांनी केलेल्या आरोपानुसार 5,000 रुपयांची ही नोट काळ्याधनाला आमंत्रण देत आहे. अर्थतज्ज्ञांनी पण ही नोटच देशात महागाईला कारणीभूत असून तिच्यामुळे रोखीतील व्यवहारांवर मोठा परिणाम होत असल्याचा दावा केला आहे. ही नोट चलनातून बाद केल्यास देशात पुन्हा करन्सी फ्लो वाढेल आणि अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल असा दावा करण्यात येत आहे.
गंभीर आरोप
अम्मर खान यांनी पाकिस्तानच्या अर्थमंत्रालयासहीत रिझर्व्ह बँकेच्या कारभाराचे वाभाडे काढले आहेत. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार, देशात जवळपास 8 लाख कोटींचे चलन कोणत्याही परवानगीशिवाय व्यवहारात वापरात आहे. त्यामुळेच देशातून कर जमा होत नाहीये. करदाते कर भरण्यास धजावत नाही. देशातील रोखीतील व्यवहार कमी झाले आहे.