तेल अवीव : पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने शनिवारी इस्रायलवर पाच हजाराहून अधिक रॉकेटने भीषण हल्ला करून युद्ध सुरु केले. इस्रायलचे सैनिक शत्रूशी लढत आहेत. यावेळी संपूर्ण देश त्यांच्या पाठिशी उभा आहे. इस्त्रायली लोक त्यांच्या घराच्या बाल्कनीत उभे राहून सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रगीत गात आहेत. इस्रायलचे राष्ट्रगीत हे ज्यूंच्या त्यांच्या जीवनातील दीर्घ संघर्षाची आठवण करून देणारे आहे आणि ते आशेचे किरण देखील दर्शवते.
देश संकटात असताना जगभरातून इस्रायली नागरिक आपल्या मायदेशी परतत आहेत. हमास विरुद्ध इस्रायलने युद्धाची घोषणा केली आहे. इस्रायली सैनिकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी इस्त्रायली लोकं राष्ट्रगीत ‘हटिक्वा’ गात आहेत. यामध्ये ज्यू लोकांच्या दीर्घ आणि कठीण प्रवासाबद्दल आणि त्यांच्या मायदेशी परतण्याचे त्यांचे स्वप्न याबद्दल लिहिले आहे. हे गाणे इस्रायली लोकांच्या ताकदीची आणि दृढनिश्चयाची आठवण करून देते. हे ज्यू लोकांना त्यांच्या मुलांचे चांगले भविष्य घडवण्याच्या वचनबद्धतेची आठवण करून देते.
An entire Israeli neighborhood gathers on their balconies to sing Hatikva, Israel’s national anthem.
I hope, they won’t be mocked by their people like left liberals mocked Indians for doing the similar act to boost the moral of our health workers during covid. pic.twitter.com/sXjviGsBcL
— BALA (@erbmjha) October 10, 2023
शनिवारी हमासने इस्रायलवर पाच हजार रॉकेटने हल्ला केला होता. हमासच्या दहशतवाद्यांनी जमीन, हवा आणि पाण्याने इस्रायलमध्ये घुसून नागरिकांना लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी अनेकांना ठार केले किंवा अपहरण केले. यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली. बुधवारी सकाळपर्यंत इस्रायल आणि हमास यांच्यातील या लढाईत तीन हजार लोक मारले गेल्याची माहिती समोर आली आहे.
इस्रायली हवाई दल गाझा पट्टीवर हवाई बॉम्बफेक करत आहे. इस्रायली सैनिकही हमासच्या दहशतवाद्यांशी जमिनीवर लढा देत आहेत. गाझाला लागून असलेली आपली सीमा सुरक्षित केल्याचे इस्रायलने म्हटले आहे. इस्रायलने एक लाख सैनिक मैदानात उतरवले आहेत.