नवी दिल्ली -35 हजार फूट (35 thousand feet)उंचीवर विमान उडत होते. महिला पायलट (female pilot)तिचं काम अत्यंत बारकाईने करीत होती, विमानातले प्रवासीही निवांतपणे जरा प्रवासाचा आनंद घेत होते. अशा वेळी याच विमानातील एका एयर होस्टेसने (Air hostess) अचानकपणे महिला पायलटला बाहेर बोलावले. त्यानंतचर जे घडले त्यामुळे ती महिला पायलट आणि प्रवासीही चांगलेच आचंबित झाले.
2 Alaska Airlines Employees Get Engaged on Pride Flight After Both Planned to Propose https://t.co/EBunXMqXGV
हे सुद्धा वाचा— People (@people) June 18, 2022
ही महिला पायलट तिच्या केबिनमधून बाहेर आल्यानंतर, एयर होस्टेस गुडघ्यावर बसली आणि तिने या महिला पायलटला प्रपोज केले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे. ही महिला पायलट याच विमान कंपनीत दुसरे विमान उडवते. तर त्याच कंपनीत ही एयरहोस्टेसही नोकरीला आहे. या दोघीही एकाच विमानाने प्रवास करत होत्या. ३५ हजार फूट उंचीवर असताना या एयर होस्टेसने तिला जागेवरुन उठवले आणि बाहेर बोलवून तिला प्रपोज केले. अलास्का एयरलाईन्सच्या विमान कंपनीचे हे विमान आणि कर्मचारी आहेत.
या एयर होस्टेसचे नाव आहे वेरोनिका रोजस, महिला पायलट जी तिची गर्लफ्रेंड आहे तिचे नाव आहे एलेजेंद्रो मोनकायो. दोघींचा हा प्रपोज व्हिडिओ, विमान ३५ हजार फूट उंचीवर असताना तयार करण्यात आलेला आहे. विमान सँन फ्रान्सिस्कोवरुन लॉस एंजिलिसला चालले होते. दोन वर्षांपूर्वी या दोघींची पहिली भेटही विमानात झाली होती, असे सांगण्यात येत आहे. दोघीही एकाच विमान कंपनीत काम करत असल्याने त्यांची नेहमी भेट होत असे.
काही भेटींनंतर वेरोनिका आणि एलेजेंद्रा यांच्यात ओळख वाढली आणि त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघींनी एकमेकींनी दोन वर्ष डेट केल्यानंतर, अनोख्या अंदाजात एकमेकींना प्रपोज केले आहे. दोघींनी या वेळी अकमेकींना अंगठ्या घातल्या आणि एकमेकांसोबत आय़ुष्यभर राहण्याची शपथही घेतली. थोडक्यात त्यांची एंगेजमेंटच यावेळी झाली. अलास्का एयरलाईन्सनेच हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिोत या दोघईही एकमेकींना विमानातील अनाऊन्समेंट सिस्टिमच्या माध्यमातून एकमेकींना प्रपोज कराताना दिसतायेत. युझर्ननी या दोघींनाही भरपूर शुभेच्छा दिल्या आहेत, आणि भावी आयुष्यासाठी त्यांचे अभिनंदनही केले आहे.