याला म्हणतात नशीब, लॉटरीचे तिकीट काढायला गेला पण झाले काय…असे जिंकले 8 कोटीचे बक्षीस

| Updated on: Jan 31, 2023 | 8:06 AM

इस्पीनोझा याला लागलेला हा लॉटरीचा जॅकपॉट 2.67 लाखांपैकी एका नशीबवान व्यक्तीला मिळतो असे फ्लोरीडा स्टेट लॉटरीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे

याला म्हणतात नशीब, लॉटरीचे तिकीट काढायला गेला पण झाले काय...असे जिंकले 8 कोटीचे बक्षीस
LOTTERY
Image Credit source: socialmedia
Follow us on

फ्लोरीडा : नशीब म्हणताच ते हेच ! अमेरीकेच्या फ्लोरीडा राज्यातील एका व्यक्तीला तब्बल एक मिलीयन डॉलर रकमेची लॉटरी लागली आहे. ही रक्कम भारतीय रूपयांमध्ये सुमारे आठ कोटी रूपये इतकी होते. त्याचे नशीब असे की तो जेव्हा लॉटरी तिकीटाच्या रांगेत उभा होता, तेव्हा कोणी दुसराच इसम त्यांच्या रांगेत शिरला त्यामुळे त्याने दुसऱ्या काऊंटरवर जाऊन तिकीट विकत घेतले आणि त्याला हे घबाड लागले.

या 25 दशलक्ष डॉलरच्या गेमच्या जॅकपॉटचे हे एकमेव बक्षीस असून त्यात शंभर डॉलरपासून बक्षिसांची रक्कम सुरू होते. इस्पीनोझा या नावाच्या अमेरीकन नागरीकाने 50 डॉलरच्या लॉटरी तिकिटातून तब्बल एक मिलीयन डॉलर (₹8.16 कोटी) जिंकले आहेत. इस्पीनोझा याने सांगितले की तो तिकिटासाठी लॉटरी मशिनच्या रांगेत उभा होता, पण एक व्यक्ती त्याच्या घुसली, ज्यामुळे त्याने दुसऱ्या ठीकाणच्या
काउंटरवर जाऊन तिकीट घेतले.

याअमेरीकन नागरीकाला लागलेला हा लॉटरीचा जॅकपॉट 2.67 लाखांपैकी एका नशीबवान व्यक्तीला मिळतो असे फ्लोरीडा स्टेट लॉटरीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. इस्पीनोझा याने $ 820,000 ची जिंकलेली रक्कम त्याच्या नवीन कुटुंबासाठी बाजूला ठेवण्याची योजना आखली आहे.

याआधी, मिशिगनच्या एका हृदयाचा आजार झालेल्या एका व्यक्तीला जो कधीच लॉटरी खेळत नाही, त्याला गॅस स्टेशनवर मिळालेल्या सुट्ट्या पैशातून सहज लॉटरीचे तिकीट विकत घेतले आणि त्याचे नशीब फळले. त्या नशीबवान व्यक्तीने खरेदी केलेल्या तिकीटातून जॅकपॉट लागला होता.

फास्ट कॅश गेमसाठी 5 डॉलरचे तिकीट खरेदी केल्यानंतर त्याला 87 लाख रुपयांचा जॅकपॉट लागला. “मी स्टोअरमधून बाहेर पडताना तिकीट पाहिलं आणि जेव्हा मी जॅकपॉट जिंकल्याचे मला दिसले, तेव्हा मी एकदम आनंदाने किंचाळलो,” मॅथ्यू स्पॉल्डिंग ( 41) यांनी राज्य लॉटरी अधिकाऱ्यांना आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.