टोकियो – जपानचे माजी पंतप्रधान (Former Japan PM)शिंजो आबे (Shinzo Abe)हे स्टेजवर भाषण करत असताला त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. आबे यांना दोन गोळ्या मारण्यात आल्या. गोळ्या मारल्यानंतर हल्लेखोर जागीच उभा राहिला. त्याने हल्ला केल्यानंतर पळून जाण्याचा प्रयत्नही केला नाही. आबे यांच्यावर हा हल्ला नारा शहरात निवडणूक प्रचारावेळी करण्यात आला. काही वेळापूर्वीच त्यांचा हा दौरा ठरला होता.मात्र त्याची माहिती या हल्लेखोराला कशी मिळाली, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. त्यांना जेव्हा गोळ्या मारण्यात आल्या, तो क्षण कॅमेरात कैद (Video)झाला आहे.
Video shows the moment former Japanese PM Shinzo Abe was shot from behind as he campaigned in the city of Nara. Abe was rushed to the hospital in critical condition.
हे सुद्धा वाचाRead more: https://t.co/gWJh3VaXRc pic.twitter.com/1DC7onCKAy
— Al Jazeera English (@AJEnglish) July 8, 2022
जेव्हा आबे हे निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. त्याचवेळी गोळ्यांचे आवाज आले. गोळ्या लागल्याने आबे जागेवरच कोसळले. त्यांच्यावर पाठीमागून गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्या ठिकाणी एकच गोँधळ उडाला. सुरक्षारक्षकांनी त्यांना तातडीने गाडीत नेले आणि हॉस्पिटलकडे नेले. मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. त्याचवेळी गोळीबार करणाऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली. त्याच्याकडून बंदूक जप्त करण्यात आली ती एखाद्या कॅमेरासारखी होती. या हल्लेखोराने स्वतानेच ही बंदूक तयार केली होती.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या हल्लेखोराने हा गोळीबार केला त्याचे वय ४२ वर्ष आहे. त्याचे नाव यामागामी तेत्सुया असे सांगण्यात आले आहे. तो माजी सैनिक होता आणि आबे यांची धोरणे त्याला पसंत नव्हती म्हणून त्याने गोळीबार केल्याचे सांगण्यात येते आहे. यामागामी याने वापरलेली स्टेनगनही जप्त करण्यात आली आहे. संपूर्ण जगात जपानमध्ये बंदुकीच्या वापराबाबत सर्वात कठोर नियम आहेत. त्या ठिकाणी खुलेआम हा प्रकार घडल्याने अनेकांचा आश्चर्य वाटले आहे. आबे यांच्यावर हल्ला करण्यासाठी स्टेनगनचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे.
शिंजो आबे हे जपानचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले पंतप्रधान होते. वयाच्या ५२ व्या वर्षी त्यांची निवड पंतप्रधानपदासाठी करण्यात आली होती. सर्वात कमी वयात पंतप्रधान होण्याचा मानही त्यांना मिळाला होता. २०२० साली कोलायटिस या आजारामुळे त्यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता.