कराची: पाकिस्तानात गेल्या एक महिन्यापासून सुरू झालेलं हिंसेचं तांडव काही शांत होताना दिसत नाही. पाकिस्तानात आज पुन्हा हिंसा भडकली. पाकिस्तानातील तहरीक ए लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या इस्लामिक संघटनेने आज सहा पोलीस अधिकाऱ्यांचं अपहरण केलं. गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या या हिंसेत अनेक लोक दगावले आहेत. (TLP group takes Pakistan police hostage amid deadly protests)
तहरीक ए लब्बैक पाकिस्तान या संघटनेचा प्रमुख साद हुसैन याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ही हिंसा भडकलेली आहे. पैगंबर मोहम्मद यांचं कार्टुन प्रकाशित झालं होतं. त्यामुळे फ्रान्सच्या राजदूताला बरखास्त करण्याची मागणी या संघटनेने केली होती. त्यासाठी संघटनेने सरकारला 20 एप्रिलची डेडलाईन दिली होती. त्यातच साद याला अटक करण्यात आल्याने त्याच्या समर्थकांनी जोरदार निदर्शने केली. या हिंसाचारात आतापर्यंत चार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानात हिंसा उसळल्यानंतर या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. लाहोरमधून ज्या सहा पोलीस अधिकाऱ्यांचं अपहरण करण्यात आलं आहे. त्यात एक वरिष्ठ पोलीस अधिकारी असून दोन अर्धसैनिक दलाचे अधिकारी आहेत, अशी माहिती लाहोर पोलिसांचे प्रवक्ते आरिफ राणा यांनी दिली आहे.
इंटरनेट सेवा ठप्प
दरम्यान, टीएलपीचे प्रवक्ते शाफिर अमीनी यांनी पोलिसांनी आज आमच्या चार समर्थकांना मारलं असून अनेकजण जखमी झाल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे पाकिस्तानच्या वृत्तवाहिन्यांनी या संघटनेवर बंदी घातल्या गेल्यापासून या संघटनेचं वृत्त देणं बंद केलं आहे. तसेच आजपासून मोबाईल आणि इंटरनेट सेवाही ठप्प करण्यात आल्या आहेत. लाहोरच्या चौक यतीमकाहनमध्ये संघटनेच्या मुख्यालयापर्यंत जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. (TLP group takes Pakistan police hostage amid deadly protests)
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 18 April 2021https://t.co/bd0OpBj09T
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2021
संबंधित बातम्या:
पाकिस्तानमध्ये मदरशात शिकणाऱ्या मुलींचं मौलानाकडूनच लैंगिक शोषण, अश्लील व्हिडीओही रेकॉर्ड
पाकिस्तान कर्जात नाकापर्यंत बुडालं, चीनच्या डावात अलगद फसलं!
(TLP group takes Pakistan police hostage amid deadly protests)