Israel-Hamas War | सबका हिसाब होगा, इस्रायलची ‘निली’, काय आहे हे?

| Updated on: Oct 23, 2023 | 3:12 PM

Israel-Hamas War | दोन आठवड्यांपूर्वी 7 ऑक्टोबरला इस्रायलने इतिहासातील भीषण दहशतवादी हल्ल्यााचा सामना केला. अनेक निष्पाप इस्रायली नागरिक मारले गेले. आतापर्यंत कधी इतका मोठा हल्ला इस्रायलवर झाला नव्हता. इस्रायल आता या सगळ्याच हिशोब चुकता करणार आहे.

Israel-Hamas War | सबका हिसाब होगा, इस्रायलची निली, काय आहे हे?
Israel-Hamas war
Follow us on

जेरुसलेम : इस्रायलच्या इतिहासातील त्यांच्यावर सर्वात क्रूर हल्ला शनिवार 7 ऑक्टोबरला झाला. याआधी इस्रायलने अनेक युद्ध लढली, दहशतवादी हल्ले झेलले. पण इतक्या मोठ्या प्रमाणात क्रूरता त्यांच्याबरोबर कधी झाली नव्हती. त्या दिवशी दक्षिण इस्रायलमध्ये जे झालं, त्याच्या आठवणींनी आजही अनेक इस्रायलींच्या काळजाचा थरकाप उडतो. नुकतीच जन्मलेली बाळं, लहान मुलं, महिला, वयोवृद्ध नागरिक यांच्यावर भयंकर अत्याचार झाले. हमासच्या दहशतवाद्यांनी अक्षरक्ष: नरसंहार केला. त्यामुळे आज प्रत्येक इस्रायली नागरिकाच्या मनात प्रचंड संताप आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासला संपवण्याची शपथ घेतली आहे. इस्रायल पृथ्वीवरच एक असा देश आहे, जे ठरवतो ते करतो. एखाद्या छोट्याशा जिल्हााएवढा हा देश एकाचवेळी सात देशांना भिडलाय. महत्त्वाच म्हणजे हे युद्ध त्यांनी जिंकलंसुद्धा.

इस्रायलने आतापर्यंत त्यांच्यावर केलेल्या प्रत्येक हल्ल्याला प्रत्युत्तर दिलय. दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना परदेशात जाऊन संपवलय. त्यामुळे 7 ऑक्टोबरच्या कारस्थानामागे जे कोणी आहेत, ज्यांनी प्रत्यक्ष हल्ले केले, त्यातला एकही जण सुटणार नाही. इस्रायलने तशी घोषणाच केलीय. आता इस्रायलने योजनेच्या प्रत्यक्ष अमलबजावणीला सुरुवात केलीय. कारण हमासच्या हल्ल्याने इस्रायलची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. मोसाद प्रमाणे इस्रायलमध्ये आणखी एक गुप्तचर यंत्रणा आहे, शीन बेट. या शीन बेटने एका नव्या युनिटची उभारणी केलीय. 7 ऑक्टोबरच्या क्रूर हल्ल्यामागे जे कोणी आहेत किंवा प्रत्यक्ष ज्यांनी हल्ला केला, त्या प्रत्येकाला संपवण हा स्पेशल युनिटचा एकमेव उद्देश असेल.

कोण रडारवर असेल?

शीन बेटने या स्पेशल युनिटला ‘निली’ हे नाव दिलय. ‘निली’ हा एक हिब्रू शब्द आहे. दक्षिण इस्रायलच्या हल्ल्यामध्ये जे कुणी आहे, त्यांना शोधून संपवण हेच ‘निली’च एकमेव काम आणि उद्देश असेल. हमासची जी कमांडो युनिट आहे नुखबा, त्यांना टार्गेट करण ही निलीवर जबाबदारी आहे. हमासच्या याच कमांडो युनिटने दक्षिण इस्रायलनेमध्ये नरसंहार केला होता. ‘निली’चा कारभार स्वतंत्रपणे चालेल. मोस्ट वाँटेड दहशतादी या युनिटच्या रडारवर असतील.