आज शुक्रवार, नसरल्लाहचा सुपुर्द-ए-खाक, खामेनेईच संबोधन, लेबनानपासून तेहरानपर्यंत एकच भिती की…

| Updated on: Oct 04, 2024 | 10:37 AM

Iran vs Israel : सध्या मिडल ईस्टमध्ये प्रचंड तणाव आहे. कधी काय होईल? हे सांगता येणार नाही अशी स्थिती आहे. इस्रायलने आपल्या शत्रुच्या वर्मी घाव घातले आहेत. त्याचवेळी इस्रायलवर सुद्धा पलटवार झाला आहे. या सगळ्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर आज मिडल ईस्टमध्ये प्रचंड तणाव असेल. पुढचा वार कसा, कधी होईल? हे कोणीच सांगू शकत नाही.

आज शुक्रवार, नसरल्लाहचा सुपुर्द-ए-खाक, खामेनेईच संबोधन, लेबनानपासून तेहरानपर्यंत एकच भिती की...
Iran vs Israel
Follow us on

इस्रायल सध्या हिज्बुल्लाह आणि इराणसह वेगवेगळ्या आघाड्यांवर युद्ध लढत आहे. शुक्रवारचा दिवस इराण आणि हिज्बुल्लाह दोघांसाठी महत्त्वाचा आहे. मागच्या आठवड्यात इस्रायलच्या हल्ल्यात मारला गेलेला हिज्बुल्लाह चीफ हसन नसरल्लाहचा आज दफनविधी आहे. इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खामेनेई आज नमाज अदा करतील. त्यानंतर नसरल्लाहच्या खात्म्यानंतर पहिल्यांदाच देशाला संबोधित करतील. खामेनेई मध्य तेहरानमधील इमाम खोमेनी ग्रांड मशिदीत नमाज अदा करतील. स्थानिक वेळेनुसार, सकाळी 10.30 वाजता नसरल्लाहच्या सम्मानार्थ एका सभेच आयोजन करण्यात आलं आहे.

नसरल्लाहला संपवल्यानंतर जवळपास एक आठवड्याने आज त्याला सुपुर्द-ए-खाक केलं जाईल. कर्बलामध्ये त्याचा दफनविधी होऊ शकतो. त्याच्या सम्मानार्थ सांकेतिक अत्यंयात्रा निघेल. इस्रायलकडून हल्ल्याची भिती असल्याने याला सांकेतिक जनाजा म्हटलं जातय. अत्यंत गोपनीय पद्धतीने हा जनाजा काढण्यात येईल अशी माहिती आहे. स्थिती सामान्य झाल्यानंतर नरसल्लाहच्या सम्मानार्थ धार्मिक आयोजन करण्यात येईल.

दफनविधीसाठी तीन जागांची चर्चा

हिज्बुल्लाहने अजूनपर्यंत नसरल्लाहच्या जनाजा बाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. इराकी पंतप्रधानांचे सल्लागार सलाहकार मोहम्मद शिया अल सुडानी यांनी सोशल मीडिया पोस्टवर माहिती दिली की, नसरल्लाहला कर्बला येथे इमाम हुसैन यांच्या शेजारी दफन केलं जाईल. लेबनान, इराकचा कर्बला किंवा इराणच्या नजफमध्ये दफनविधी होईल अशी सुद्धा शक्यता आहे.

शिया मुस्लिम कर्बलाला….

दक्षिण बगदादच्या कर्बला येथे इमाम हुसैन यांची कब्र आहे. याच ठिकाणी नसरहल्लाहचा दफनविधी होऊ शकतो. नसरल्लाहची ख्याती आणि इस्लामिक जगतात त्याची उंची लक्षात घेता कर्बला येथे त्याचा दफनविधी होऊ शकतो. शिया मुस्लिम कर्बलाला पवित्र भूमी मानतात. 80 च्या सुरुवातीच्या दशकात इराणच्या नजफ येथे नसरल्लाहच शिक्षण झालं होतं.

इराणला कसली भिती?

मिडिल ईस्टमध्ये आतापर्यंतच्या लढाईत इस्रायलने धक्कातंत्राचा वापर केलाय. हिज्बुल्लाहचा चीफ हसन नरसल्लाहने धमकी दिल्यानंतर पुढच्या काही मिनिटात इस्रायली फायटर जेट्सनी लेबनानला हादरवून सोडलं होतं. आज इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खामेनेई संबोधित करणार आहेत. इराणने इस्रायलवर बॅलेस्टिक मिसाइल हल्ला केल्यानंतर इस्रायलने अजून प्रत्युत्तर दिलेलं नाही. नसरल्लाहने संबोधनात धमकीची भाषा वापरल्यानंतर जे झालं तसच खामेनेई यांच्याबाबतीतही होण्याची भिती इराणला आहे.