अमेरिकेचा नवा अध्यक्ष कोण होणार याबाबत संपूर्ण जगाला उत्सुकता आहे. माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदार पुन्हा संधी देणार की भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना निवडणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आता फार कमी दिवस उरले आहेत. दरम्यान, एका माजी मॉडेलने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्पवर यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केलाय. 90 च्या दशकात प्रोफेशनल मॉडेल म्हणून काम करणाऱ्या स्टेसी विल्यम्स यांनी सांगितले की, ती जेफ्री एपस्टाईनच्या माध्यमातून ट्रम्प यांना भेटली होती. न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवरमध्ये त्यांनी तिचा विनयभंग केला होता. एपस्टाईनने 2019 मध्ये तुरुंगात आत्महत्या केली होती.
पेनसिल्व्हेनियाचे मूळ रहिवासी असलेले 56 वर्षीय विल्यम्स यांनी सर्व्हायव्हर्स फॉर कमला नावाच्या ग्रुपने आयोजित केलेल्या कॉलवर या घटनेबद्दल खुलासा केला. हा ग्रुप डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिसला यांना पाठिंबा देत आहे. ५ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या टीमने हे आरोप स्पष्टपणे खोटे असल्याचे वर्णन केले आहे.
द गार्डियनमधील एका वृत्तानुसार, विल्यम्स यांनी सांगितले की, 1992 दरम्यान एका ख्रिसमस पार्टीमध्ये ट्रम्प आणि तिची भेट झाली होती. विल्यम्सने आरोप केला की काही महिन्यांनंतर एपस्टाईनने तिला न्यूयॉर्कमधील ट्रम्प टॉवर्समध्ये ट्रम्प यांना भेटण्यासाठी बोलवले होते. ट्रम्प यांनी तिचे प्रेमाने स्वागत केले, परंतु नंतर त्यांनी तिला विविध ठिकाणी अयोग्यरित्या स्पर्श केले. ती म्हणाले की, मी अस्वस्थ झाली होती. ट्रम्प टॉवरमधून बाहेर पडल्यानंतर एपस्टाईन माझ्यावर रागावले आणि मी ट्रम्प यांना मला स्पर्श का करू दिला असे विचारले.
विल्यम्स म्हणाले की, “मला लाज आणि किळस वाटली. ट्रम्प मला खूप घृणास्पद वाटले आणि मला आठवते की मी पूर्णपणे गोंधळून गेले होते. त्यानंतर मी एपस्टाईनशी संबंध तोडले. पण ट्रम्प यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. द गार्डियनच्या म्हणण्यानुसार, अनेक महिलांनी यापूर्वी त्यांच्यावर अशाच प्रकारचे वर्तन केल्याचा आरोप केला आहे, ज्यात संमतीशिवाय चुंबन घेणे, अयोग्य स्पर्श करणे आणि चेंजिंग रूममध्ये हँग आउट करणे समाविष्ट आहे.