Titanic Tourist Submarine : टायटॅनिक पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन गेलेली पाणबुडी समुद्रात गायब, काय घडलं?

| Updated on: Jun 20, 2023 | 12:20 PM

Titanic Tourist Submarine : समुद्रात खोलवर किती हजार मीटर आत ही पाणबुडी गेली होती? पाणबुडीमध्ये किती तासाचा ऑक्सिजन शिल्लक आहे? समुद्रात पाणबुडीसोबत काय घडलं? जाणून घ्या.

Titanic Tourist Submarine : टायटॅनिक पाहण्यासाठी पर्यटकांना घेऊन गेलेली पाणबुडी समुद्रात गायब, काय घडलं?
Titanic ship wreck
Image Credit source: @MiniTrueArchive Twitter
Follow us on

न्यू यॉर्क : 19 व्या शतकात टायटॅनिक या महाकाय जहाजाची निर्मिती करण्यात आली. हे जहाज कधी बुडणार नाही, असा दावा करण्यात आला होता. पण आपल्या पहिल्याच प्रवासात उत्तर अटलांटिक महासागरात टायटॅनिकला जलसमाधी मिळाली. या बुडालेल्या टायटॅनिक जहाजाबद्दल आजही अनेकांना अप्रूप, कुतूहल आहे. टायटॅनिक जहाजाबद्दलच्या गोष्टी आजही त्याच कुतूहलापोटी वाचल्या जातात. उत्तर अटलांटिक महासागराच्या तळाशी अजून टायटॅनिक जहाजाचा ढिगारा आहे.

हाच ढिगारा पाहण्यासाठी पर्यटक जात असतात. आता टायटॅनिकचा असाच ढिगारा पाहण्यासाठी गेलेल्या एका पाणबुडीला दुर्घटना झाल्याची भिती आहे. टायटॅनिकचा ढिगारा पाहण्सााठी पर्यटकांना घेऊन गेलेली एक पाणबुडी उत्तर अटलांटिक महासागरात बेपत्ता झाली आहे.

रेस्क्यूसाठी ऑपरेशन

बीबीसीने बोस्टन कोस्टगार्डच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. सबमरीनला शोधण्यासाठी सर्च अँड रेस्क्यू टीमच घटनास्थळावर ऑपरेशन सुरु आहे. न्यूफाऊडलँडवर हे ऑपरेशन सुरु आहे. पाणबुडीमधून पर्यटकांना ढिगारा दाखवण्यासाठी नेलं जायच.

किती पर्यटक पाणबुडीत होते?

पाणबुडीमध्ये किती पर्यटक आहेत, त्या बद्दल माहिती मिळू शकलेली नाही, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. काही छोट्या-छोट्या पाणबुड्या टायटॅनिकचा ढिगारा दाखवण्यासाठी पर्यटकांना घेऊन जातात. खोल समुद्राच्या तळाशी 3800 मीटरवर टायटॅनिकचा ढिगारा आहे. टायटॅनिक बुडाल्यानंतर 1985 मध्ये समुद्राच्या तळाशी या महाकाय जहाजाचे अवशेष सापडले होते.

पाणबुडीमध्ये किती तास पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक?

पर्यटकांची पाणबुडी बुडाल्याच्या बातमीने सगळ्यांनाच धक्का बसलाय. स्थानिक अधिकारी घटनास्थळावर आहेत. प्रशासनाकडून अनेक टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. बेपत्ता असलेल्या पाणबुडीबद्दल कुठलीही माहिती नाहीय. पाणबुडीमध्ये 70 ते 96 तास पुरेल इतका ऑक्सिजन शिल्लक आहे.

यावर्षी फेब्रुवारी महिन्यात टायटॅनिकच्या ढिगाऱ्याचा व्हिडिओ समोर आला होता. या जहाजामध्ये शेष राहिलेल्या अवशेषांची 80 मिनिटांच अनकट फुटेज दाखवण्यात आलं होतं. मे महिन्यात या जहाजाच 3 डी स्कॅन समोर आलं. यात हाय रेजोल्युशनचे फोटो होते.