China Covid Updates: धोका वाढला! चीनमधील ‘या’ पर्यटनस्थळावर बंदी

| Updated on: Oct 25, 2021 | 4:12 PM

चीनमध्ये परत कोरोना महामारीचा फैलाव होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती गंभीर होत चालली आहे आणि आता तर चीनने काही पर्यटनस्थळं बंद करायला सुरूवात केलीय.

China Covid Updates: धोका वाढला! चीनमधील या पर्यटनस्थळावर बंदी
China increase mass testing
Follow us on

बीजिंग: चीनमध्ये परत कोरोना महामारीचा फैलाव होताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती गंभीर होत चालली आहे आणि आता तर चीनने काही पर्यटनस्थळं बंद करायला सुरूवात केलीय. सोमवारी चीनने उत्तर-पश्चिमेकडचा गन्सू प्रांतांतील सर्व पर्यटन स्थळे बंद केली. गन्सू प्रांत पर्यटनावरच मुख्य प्रमाणात अवलंबून आहे, मात्र वाढती रुग्णसंख्या बघता हा निर्यण घेण्यात आला. गेल्या 24 तासांत स्थानिक कोरोना संक्रमणाची (local transmission) 35 नवीन प्रकरणं सापडलीत. गन्सू प्रांत प्राचीन सिल्क रोडच्या कडेला आहे आणि बौद्ध प्रतिमा आणि इतर धार्मिक स्थळांनी प्रसिद्ध आहे. (tourists places closed as covid cases rise in China)

कोणते भाग प्रभावित?

चीनमधल्या इनर मंगोलिया प्रदेशातसुद्धा कोरोनाचे 19 नवीन रुग्ण आढळले आणि काही रुग्ण त्याच्या आसपासच्या भागात पसरलेली आहेत. मंगोलिया भागातील रहिवाशांना घरातच राहण्याचे आदेश देण्यात आलेत. इनर मंगोलियातील कोरोनाच्या नव्या विस्फोटामुळं कोळसा आयातीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नवे कोरोना रुग्ण हे वयस्कर जोडप्यांशी संबंधित आहे. शांघाय, झियान गन्सू आणि मंगोलिया प्रांतात त्या जोडप्यानं प्रवास केल्याचं समोर आलंय. त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्यांनाही संसर्ग झाल्याचं समोर आलं असून, चीनची राजधानी बीजिंगमध्येही काही रुग्ण आढळून आलेत.

चीनमधील उत्तरेकडील लांझोऊ शहरातील 40 लाख नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलंय. ज्यांना घराबाहेर पडायचंय त्यांनी कोरोना चाचणी करुन अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय बाहेर पडू नये, अशा सूचना देण्यात आल्यात.

बीजिंग ऑलिंपिकसाठी चिंता वाढली

कोरोना महामारीविरोधात झिरो टॉलरेन्स पॉलिसी आहे, ज्यात लॉकडाऊन, विलगीकरण, अनिवार्य कोविड चाचणी या सारख्या धोरणांचा समावेश आहे. बीजिंगमध्ये फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिंपिकच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या प्रवासी आणि पर्यटन ग्रुप्समुळे कोरोना वायरसच्या डेल्टा वेरिएंटचा प्रसार होण्याची चिंता चीनला सतावतेय. परदेशी प्रेक्षकांना आधीच बंदी आहे आणि खेळात सहभागी होणाऱ्यांनी बाहेरील लोकांपासून वेगळे करणाऱ्या बबलमध्ये (bubble) राहावे लागणार आहे.

विमान फेऱ्या रद्द

कोरोनाचं संकट वाढलेल्या प्रांतामधील विमानांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. झियान आणि लांझोऊ प्रांतातील 60 टक्के फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. इरेनहोत आणि इनर मंगोलिया या दोन्ही शहरांतर्गत वाहतूक रद्द करण्यात आली आहे. नागरिकांना घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आलीय.

इतर बातम्या

Covid Updates:लसीकरण झालेल्या परदेशी प्रवाशांना आजपासून विलगीकरण नाही; मात्र, आरटीपीसीआर रिपोर्ट हवाच

पंतप्रधान मोदी लाँच करणार 64 हजार कोटींची हेल्थ इन्फ्रा स्कीम, जाणून घ्या सर्वकाही

tourists places closed as covid cases rise in China