अंकारा : तुर्कीच्या अंकारा येथे सोमवारी झालेल्या शक्तीशाली भूकंपामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. सोमवारी पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी हा भूकंप आला. या भूकंपात गाढ झोपेत असलेल्या नागरिकांचा जागीच मृत्यू झाला. या भूकंपात आतापर्यंत तब्बल 7 हजार लोक दगावले आहेत. तर 15 हजाराहून अधिक लोक जखमी झाले आहेत. हा भूकंप अत्यंत शक्तीशाली होता. तो इतका की भूकंपामुळे संपूर्ण तुर्की देश 10 फुटाने सरकला आहे. सोमवारपासून गेल्या तीन दिवसात तुर्कीत 550 वेळा भूकंप आला आहे. या भूकंपामुळे प्रचंड नुकसान झाल्याने संपूर्ण देशात तीन महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
सीरीयाच्या तुलनेत तुर्कीची टेक्टोनिक प्लेट्स पाच ते सहा मीटर सरकू शकते, असं इटलीचे भूकंप तज्ज्ञ डॉय कार्लो डोग्लियोनी यांनी सांगितलं. तुर्की अनेक प्रमुख फॉल्टलाइनवर आहे. या फॉल्टलाइन एनाटोलियन प्लेट, अरेबियन प्लेट आणि युरेशियाई प्लेटशी निगडीत आहे.
त्यामुळे भूकंपाने तुर्कीचं प्रचंड नुकसान झालं आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार, एनाटोलियन प्लेट आणि अरेबियन प्लेट दरम्यानची 225 किलोमीटरची फॉल्टलाइन तुटली आहे.
प्राथमिक डेटाच्या आधारावर ही माहिती दिली जात आहे. येत्या काही दिवसात सॅटेलाईटद्वारे अधिक तंतोतंत माहिती मिळणार आहे. भूकंपाची तीव्रता पाहिली तर टेक्टोनिक प्लेट शिफ्ट होणे तर्कसंगत आहे, असं प्रोफेसर डॉ. बॉब होल्डवर्थ यांचं म्हणणं आहे. भूकंपाची तीव्रता आणि टेक्टोनिक प्लेट्स सरकने याचा थेट संबंध आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, सोमवारी पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंप झाला. तुर्कीत सोमवारपासून आतापर्यंत 550 वेळा भूकंपाचे झटके जाणवले. तुर्की आणि सीरियात आतापर्यंत 6200 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती अर्दोगन यांनी देशातील दहा प्रांतात तीन महिन्यांसाठी आणीबाणी लागू केली आहे. शाळांना 13 फेब्रुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. भारतासह 70 देशाने तुर्कीला मदतीचा हात दिला आहे.
जमिनीच्या आत सात टेक्टोनिक प्लेट्स आहेत. या प्लेट्स सातत्याने फिरत असतात. जेव्हा या प्लेट्स एकमेकांना धडकतात, एकमेकांवर रगडतात किंवा एकमेकांवर चढतात वा एकमेकांपासून वेगळ्या होतात तेव्हा जमीन हलू लागते. त्यालाच भूकंप म्हणतात. रिश्टर स्केलवर भूकंप मोजला जातो. त्याला रिक्टर मॅग्निट्यूड स्केल म्हणतात.