तुर्की मध्ये भूकंप झाला आणि सगळ्या जगात त्याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. हा भूकंप इतका शक्तिशाली होता ज्याचा परिणाम असा झाला की तुर्की देशच 10 फुटाने सरकला. 15 हजारपेक्षा अधिक लोक जखमी झाले आणि मृत्यूचा आकडा सुद्धा 8 हजारापेक्षा जास्त आहे. 6 फेब्रुवारीला, पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी हा भूकंप झाला आणि तुर्की देश दुःखाच्या सागरात बुडाला. एकूण 550 वेळा इथे भूकंप झालाय, आता हे नुकसान भरून निघायला तुर्कीला कित्येक वर्ष जाणार आहेत. इथे आता आणीबाणी घोषित करण्यात आलीये.
भूकंपाच्या जागेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झालेत. घटनास्थळी जेव्हा मदतीसाठी इथे वेगवेगळ्या टीम्स दाखल झाल्या तेव्हा इथले फोटो, व्हिडीओ प्रचंड प्रमाणात बाहेर आहे.
इथले नागरिक, लहान मुलं यांची सुटका करतानाचे व्हिडीओ. लहान मुलं ढिगाऱ्याखाली अडकलेले व्हिडीओ. यात एक व्हिडीओ प्रचंड भावूक करणारा आहे. हा व्हिडीओ लहान बहीण भावंडांचा आहे. या व्हिडीओमध्ये हे दोघेही ढिगाऱ्याखाली अडकलेत.
बरं या सगळ्यात हृदयद्रावक गोष्ट काय? ही भावंडं रेस्क्यू टीमला म्हणतायत, “आम्हाला वाचावा, आम्ही तुमची आयुष्यभर गुलामी करू”. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. व्हिडीओ पाहताना नकळत आपल्याला आयुष्याची किंमत कळून चुकते. आयुष्य वाचवा म्हणत ही इवलीशी मुलं सुद्धा आयुष्यभर गुलामी करायला तयार आहोत, ज्यांना कदाचितच गुलामीचं महत्त्व माहित असेल.
This video broke my heart ?
The little girl says to the rescuer when he reaches her: Get me out from under this wreckage,sir,me and my sister, and I will become your slave.#earthquakeinturkey #Syria #هزه_ارضيه #زلزال #İstanbul #earthquake #Turkey #PrayForTurkey pic.twitter.com/U9mMrZdROM
— Zuher Almosa (@AlmosaZuher) February 7, 2023
हा व्हिडीओ हृदय पिळवटून टाकणारा आहे. ही इवलीशी मुलं जेव्हा आयुष्यासाठी इतका मोठा संघर्ष करतात तेव्हा जीव खाली वर होतो. कोण म्हणेल आयुष्यभर गुलामी करतो? पण जेव्हा प्रश्न आयुष्याचा असतो माणूस काहीही करायला तयार होतो. मग ती लहान मुलं का असेनात.