Covishield vaccine : भारताच्या दबावासमोर ब्रिटन झुकला, कोव्हिशिल्ड लसीला मंजुरी, मात्र एका अटीने अडचण

| Updated on: Sep 22, 2021 | 2:35 PM

भारताच्या वाढत्या दबावानंतर, ब्रिटनने अखेर भारतात बनवलेली कोरोना लस कोव्हिशिल्डला  (Covishield vaccine ) परवानगी दिली आहे. यूकेने आपला निर्णय बदलून नवीन प्रवास नियमावली जारी केली आहे.

Covishield vaccine : भारताच्या दबावासमोर ब्रिटन झुकला, कोव्हिशिल्ड लसीला मंजुरी, मात्र एका अटीने अडचण
Covishield vaccine
Follow us on

नवी दिल्ली : भारताच्या वाढत्या दबावानंतर, ब्रिटनने अखेर भारतात बनवलेली कोरोना लस कोव्हिशिल्डला  (Covishield vaccine ) परवानगी दिली आहे. यूकेने आपला निर्णय बदलून नवीन प्रवास नियमावली जारी केली आहे. भारताच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनने हा निर्णय घेतला. आता ज्यांनी भारताच्या कोव्हिशिल्ड लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांना ब्रिटनमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मात्र ब्रिटनने कोव्हिशील्ड लसीच्या प्रमाणपत्राला मंजुरी दिलेली नाही. त्यामुळे लस घेतल्याचा पुरावा काय दाखवायचा हा प्रश्न तर आहेच, शिवाय परवानगी देऊनही प्रमाणपत्राला मंजुरी नसल्याने क्वारंटाईनचे जुने नियमच पाळावे लागण्याची चिन्हं आहेत.

भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ब्रिटनकडे कोविशील्ड लसीला मान्यता नसल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. परराष्ट्र मंत्री म्हणाले होते की कोविडशील्ड लसीला परवानगी न करणे हे भेदभाव करणारे धोरण आहे. यानंतर ब्रिटनने ते लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले होते. अखेर ब्रिटनने भारताच्या कोव्हिशील्ड लसीला परवानगी दिली.

10 दिवस क्वारंटाईन

ब्रिटनमध्ये कोरोना नियम बदलून कोविशील्डचे दोन्ही डोस असूनही ब्रिटनमध्ये येणाऱ्यांना 10 दिवसांचे क्वारंटाईन अनिवार्य केले होते. अशा परिस्थितीत भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी कोविडशील्ड लसीबाबत ब्रिटीश सरकार भेदभाव करत असल्याचं म्हटलं होतं. पण ब्रिटनने भारताच्या लसीचे प्रमाणपत्र मंजूर केलेले नाही. यामुळे, भारतीय प्रवाशांमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल होणार नाही.

सध्या ब्रिटनच्या प्रवेशासाठी लाल, पिवळा आणि हिरव्या अशा तीन वेगवेगळ्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. धोक्यानुसार वेगवेगळ्या देशांना वेगवेगळ्या याद्यांमध्ये ठेवण्यात आले आहे. 4 ऑक्टोबरपासून सर्व याद्या विलीन केल्या जातील आणि फक्त लाल यादीच राहिल. लाल यादीत समाविष्ट असलेल्या देशांतील प्रवाशांना यूकेच्या प्रवासावर निर्बंध येतील. भारत अजूनही पिवळ्या यादीत आहे.

संबंधित बातम्या  

लसीबाबत ब्रिटनची वर्णद्वेषी वृत्ती, भारतात संताप, सध्या इंग्लंडला न जाणे उत्तम?

कोव्हिशील्ड लस घेणाऱ्या भारतीयांना युरोप प्रवासासाठी कटकटी, पुनावाला म्हणाले टेन्शन मिटवणारच