इंग्लंडमध्ये भारताची चमक, भारतीय वंशाचे 26 जण खासदार, मंत्रिपदातही वाटा…पाहा संपूर्ण यादी

| Updated on: Jul 07, 2024 | 3:00 PM

UK general election: गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. याआधी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 15 भारतीयांनी विजय मिळवला होता. नवीन पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी भारतीय वंशाच्या महिला खासदार लिसा नंदी यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांचा मंत्रिमंडळात सहभाग केला आहे.

इंग्लंडमध्ये भारताची चमक, भारतीय वंशाचे 26 जण खासदार, मंत्रिपदातही वाटा...पाहा संपूर्ण यादी
26 Indian-origin MPs elected to UK Parliament
Follow us on

ब्रिटनमध्ये तब्बल 14 वर्षांनंतर सत्तातंर झाले आहे. विद्यामान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा दणदणीत पराभव झाला आहे. मजूर पक्ष (लेबर पार्टी) सत्तेत आली आहे. इंग्लंडमधील सार्वत्रिक निवडणुकीत कीर स्टार्मर यांच्या मजूर पक्ष चार पार झाला आहे. त्यांच्या पक्षाला 412 जागा मिळाल्या. तर ऋषी सुनक यांच्या कंझर्व्हेटिव्ह पक्षाला 121 जागा मिळाल्या. या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे इंग्लंडच्या जनतेने भारतीय वंशाच्या नेत्यांवर खूप विश्वास टाकला आहे. या निवडणुकीत तब्बल 26 भारतीय वंशाचे नेते विजयी झाले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण दुप्पट आहे. याआधी 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत 15 भारतीयांनी विजय मिळवला होता. नवीन पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी भारतीय वंशाच्या महिला खासदार लिसा नंदी यांच्यावर महत्वाची जबाबदारी दिली आहे. त्यांचा मंत्रिमंडळात सहभाग केला आहे.

कोण, कोण झाले विजयी

लेबर पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या सीमा मल्होत्रा ​यांनी त्यांच्या फेल्थम आणि हेस्टन मतदारसंघात मोठ्या फरकाने विजय मिळवला आहे. व्हॅलेरी वाझ या गोव्यातील रहिवासी आहेत. लिसा नँडीला विगन येथे यश मिळाले आहे. ब्रिटीश शीख खासदार प्रीत कौर गिल, तनमनजीत सिंग ढेसी, ​​नवेंदू मिश्रा आणि नादिया व्हिटोम यांनीही विजय मिळवला. तर, जस अठवाल, बेगी शंकर, सतवीर कौर, हरप्रीत उप्पल, वरिंदर ज्यूस, गुरिंदर जोसन, कनिष्क नारायण, सोनिया कुमार, सुरीना ब्रेकनब्रिज, किरीथ एंटविस्टल, जीवन संधेर आणि सोजन जोसेफ यांनीही विजय मिळवला आहे.

UK general election

माजी पंतप्रधान ऋषी सुनक विजयी

माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी यॉर्कशायरमधील रिचमंड आणि नॉर्थलर्टन मतदारसंघात निर्णायक विजय मिळला आहे. कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेत्यांना टोरी खासदार असेही म्हणतात. त्यांच्या जागा परत जिंकण्यासाठी इतर प्रमुख ब्रिटिश भारतीय टोरी नेत्यांमध्ये माजी गृहमंत्री सुएला ब्रेव्हरमन आणि प्रिती पटेल यांचा समावेश आहे. गगन महिंद्रा यांनी दक्षिण पश्चिम हर्टफोर्डशायरची जागा जिंकली. तर लिसेस्टर पूर्व मतदारसंघात शिवानी राजा विजयी झाल्या आहेत. येथून भारतीय वंशाचे राजेश अग्रवाल यांच्याविरुद्ध लढत होती. लिबरल डेमोक्रॅट्सने सर्व क्षेत्रांत चांगली कामगिरी केली आणि 60 पेक्षा जास्त जागा मिळवल्या. यापैकी भारतीय वंशाच्या मुनिरा विल्सन या ट्विकेनहॅम मतदारसंघातून पुन्हा विजयी झाल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

मजूर पक्षाचे विजयी भारतीय वंशाचे उमेदवार

  • 1. व्हॅलेरी वेज
  • 2. लिसा नंदी
  • 3. तनमजीत सिंग
  • 4. नवेंदु मिश्रा
  • 5. नादिया व्हिटोम
  • 6. जस अठवाल
  • 7. बागी शंकर
  • 8. सतवीर कौर
  • 9. हरप्रीत उप्पल
  • 10. वरिंदर जस
  • 11. गुरिंदर जोसन
  • 12. कनिष्क नारायण
  • 13. सोनिया कुमार
  • 14. सुरीना ब्रॅकनब्रिज
  • 15. किरीथ एन्टविसल
  • 16. जीवन संधेर
  • 17. सोजन जोसेफ

कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे विजयी भारतीय वंशाचे उमेदवार

  • 1. ऋषी सुनक
  • 2. सुएला ब्रेव्हरमन
  • 3. प्रीती पटेल
  • 4. गगन मोहिंद्र
  • 5. शिवानी राजा

इतर पक्षांचे विजयी भारतीय वंशाचे उमेदवार

  • 1.मुनिरा विल्सन
  • 2. निगेल फॅरेज

नवीन पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळात भारतीय

नवीन पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आपल्या मंत्रिमंडळात भारतीय वंशाच्या नेत्यांना स्थान दिले. खासदार लिसा नंदी यांना संस्कृती, क्रीडा आणि माध्यम मंत्रालय दिले आहे. लिसा नंदी हिचे वडील दीपक नंदी इंग्रजी साहित्यामधील प्रसिद्ध नाव आहे. ते 1956 मध्ये ब्रिटनमध्ये गेले होते. लिसाने लंडनमधील न्यूकासल विद्यापीठातून 2001 मध्ये पदवी घेतली आहे. त्यानंतर लंडन विद्यापीठातून पदवीत्तर पदवी घेतली.