रशिया आणि यूक्रेन दरम्यान युद्ध सुरु आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूक्रेन दौरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा होता. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यूक्रेनी राष्ट्रपती वोलोदिमिर जेलेंस्कीसोबत दोन्ही देशांमध्ये शांतता निर्माण करण्याबाबत चर्चा केली. नरेंद्र मोदी यांचा दौरा संवेदनशील होता. कारण भारत रशियाकडून तेल आयात करत आहे. त्यामुळे यूक्रेनमध्ये भारतासंदर्भात असंतोष निर्माण झाला होता. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा ओसिसमधील पीस पार्कमध्ये महात्मा गांधींची प्रतिमा अनावरण करण्यासाठी पोहचले तेव्हा सुरक्षा अधिक कडक केली गेली. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ने तटबंदी केली. एसपीजीने पीएम मोदींच्या सुरक्षेसाठी बुलेट रजिस्टँट शील्ड लावली होती.
भारताच्या रशियासोबतच्या संबंधांबाबत युक्रेनमधील लोकांमध्ये नाराजी आहे. त्याची कल्पना पंतप्रधान कार्यालयाला आधीच होती. त्यामुळे पंतप्रधानांच्या टीमने एसपीजीला भारतविरोधी घटकांची माहितीही दिली होती. या परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी एसपीजीचे संचालक आलोक शर्मा यांच्या नेतृत्वाखाली किमान 60 एसपीजी कमांडो तैनात करण्यात आले होते. भारतीय वंशाच्या लोकांच्या भेटीतही ही बाब समोर आली. रशिया आणि भारत यांच्यातील संबंधांमुळे युक्रेनमधील नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे अनेकांनी भारतीय लोकांनी पंतप्रधान मोदी यांना सांगितले.
मोदी यांच्या या दौऱ्यात एसपीजी टीम 24 तास अलर्टवर होती. नरेंद्र मोदी पीस पार्कमध्ये फिरतानाही स्नायपर्सची भीती होती. या परिस्थितीमुळे एसपीजी टीम अलर्टवर होती. वृत्तवाहिन्यांनी जारी केलेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण परिसरात सैनिक तैनात केलेले दिसत आहे. तसेच बीआर शील्ड लावण्यात आल्याचे दिसून येते. नरेंद्र मोदी पोलंडला परत जाण्यासाठी ट्रेनमध्ये चढले तेव्हा एसपीजी टीमलाही दिलासा मिळाला. पोलंडमधूनच ते भारतात रवाना झाले.
पीएम मोदी यांनी वोलोदिमिर जेलेंस्की यांनी सांगितले की, शांततेसाठी दोन्ही पक्षांत संवाद गरजेचा आहे. रशियासोबत बसून शांततेचा मार्ग शोधला पाहिजे. आम्ही तटस्थ नाही. सुरुवातीपासून आम्ही शांततेची बाजू घेतली आहे. आम्ही बुद्धच्या धरतीवरुन येतो. यामुळे युद्धाला स्थान नाही. भारत रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता निर्माण करण्यासाठी आपली भूमिका बजावण्यास तयार आहे, असे मोदी यांनी जेलेंस्की यांना सांगितले.