अमेरिकन क्षेपणास्त्राची कमाल, युक्रेनच्या हल्ल्यात रशियाची डिफेन्स सिस्टम नष्ट, पुतिन यांनीही मान्य केले युक्रेनचे यश

| Updated on: Nov 28, 2024 | 7:38 AM

Ukraine Russia War: युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाने प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केली. रशियाने युक्रेनवर 188 लढाऊ ड्रोन पाठवले. दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु झाल्यानंतर रशियाचा हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे. युक्रेनच्या सैन्याने 76 ड्रोन पाडले. तसेच 96 ड्रोनचा संपर्क तुटला.

अमेरिकन क्षेपणास्त्राची कमाल, युक्रेनच्या हल्ल्यात रशियाची डिफेन्स सिस्टम नष्ट, पुतिन यांनीही मान्य केले युक्रेनचे यश
Ukraine hit it with US-made missiles
Follow us on

Ukraine Russia War: युक्रेन आणि राशिया यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून युद्ध सुरु आहे. या युद्धात युक्रेनच्या लष्कराने रशियाला मोठा झटका दिला आहे. युक्रेनने रशियाची अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली एस-400 नष्ट केली आहे. युक्रेनचे हे यश रशियानेही मान्य केले आहे. युक्रेनने हा हल्ला अमेरिकेकडून मिळालेल्या ATACMS या क्षेपणास्त्राने केला आहे. हे क्षेपणास्त्र लांब पल्लाचे आहे. रशियातील कुर्स्क भागात युक्रेनच्या हल्ल्यात एअर डिफेन्स सिस्टीम आणि एअरबसचे नुकसान झाले. रशियाने या हल्ल्यास जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचे सांगितले आहे.

रशियाकडून उत्तर कोरियाच्या सैन्याची नियुक्ती

रशिया आतापर्यंत आपल्या S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला अजिंक्य म्हणत होता. पण आता युक्रेनच्या हल्ल्याने त्याचा पर्दाफाश केला आहे. अमेरिकेने युक्रेनला या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर करण्याची परवानगी दिल्यानंतर रशिया आणि युक्रेनमध्ये तणाव वाढला आहे. प्रत्युत्तर म्हणून रशिया आता उत्तर कोरियाचे सैन्य तैनात करत आहे. एवढेच नाही तर रशियाने प्रथमच ओरॅशनिक क्षेपणास्त्राने हल्ला केल्याने संपूर्ण जग आश्चर्यचकित झाले आहे. रशियाने नुकतेच हे क्षेपणास्त्र बनवल्याचा दावा केला आहे.

रशियाकडून जोरदार उत्तर

युक्रेनने रशियाच्या एस-400 डिफेंस सिस्टीमवर क्षेपणास्त्र हल्ला केला. हा खूप गंभीर प्रकार मानला जात आहे. ही प्रणाली रशियासाठी खूप महत्वाची आहे. ज्याप्रमाणे अमेरिकेसाठी पेट्रियट मिसाइल डिफेंस सिस्‍टमचे महत्व आहे, त्याप्रमाणे या प्रणालीचे महत्व रशियाला आहे. रशियाचे संरक्षण विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, युक्रेनने पाच क्षेपणास्त्र डागले. त्यापैकी तीन क्षेपणास्त्र निकामी करण्यात यश आले. परंतु दोन क्षेपणास्त्रांनी आपले लक्ष्य साधले. त्यामुळे एस 400 डिफेंस सिस्टीमचे नुकसान झाले. तसेच आमचे काही सैनिकही मारले गेले.

युक्रेनच्या हल्ल्यानंतर रशियाने प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरु केली. रशियाने युक्रेनवर 188 लढाऊ ड्रोन पाठवले. दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरु झाल्यानंतर रशियाचा हा सर्वात मोठा ड्रोन हल्ला आहे. युक्रेनच्या सैन्याने 76 ड्रोन पाडले. तसेच 96 ड्रोनचा संपर्क तुटला.