Ukraine-Russia War : पुतिन यांना झटका, अखेर युक्रेनला रशिया विरोधात मिळालं गेम चेंजर अस्त्र

| Updated on: Aug 05, 2024 | 2:37 PM

Ukraine-Russia War : नाटो आणि अमेरिकेकडून मिळणाऱ्या मदतीवर युक्रेन अजूनही रशिया विरोधात टिकून आहे. या युद्धात युक्रेनच बरच मोठ नुकसान झालं आहे. त्यांचा बराचसा भूभाग रशियाच्या ताब्यात आहे. आता दोन वर्षांनी युक्रेनला रशिया विरोधात गेम चेंजर ठरणार एक अस्त्र मिळालं आहे.

Ukraine-Russia War : पुतिन यांना झटका, अखेर युक्रेनला रशिया विरोधात मिळालं गेम चेंजर अस्त्र
ukraine big attack on russia
Follow us on

मागच्या दोन वर्षांपासून रशिया-युक्रेनमध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. अमेरिका आणि नाटोकडून मिळणाऱ्या बळावर युक्रेन रशिया विरोधात लढाई लढत आहे. रशियाने या युद्धात युक्रेनचा बराचसा भाग ताब्यात घेतला आहे. युक्रेनला आता दोन वर्षांनी रशिया विरोधात गेम चेंजर ठरणार शस्त्र मिळालं आहे. युक्रेनला आता अमेरिका निर्मित F-16 विमानं मिळाली आहेत. युक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेंस्की यांनी रविवारी ही माहिती दिली. युक्रेनला अमेरिका निर्मित F-16 विमानांची पहिली स्क्वाड्रन मिळाली आहे. रशियन सैन्याला मागे ढकलण्यासाठी युक्रेनला अशा विमानांची गरज आहे.

“युक्रेन बऱ्याच काळापासून अमेरिका आणि नाटो देशांकडे फायटर विमानांची मागणी करत होता. आम्ही अनेकदा असंभव शब्द ऐकतो. आता हे वास्तव आहे. युक्रेनच्या आकाशात आमच्याकडे F-16 विमान असतील” असं राष्ट्रपति जेलेंस्की म्हणाले. आम्हाला त्या सर्वांवर गर्व आहे, ज्यांच्याकडे F-16 फायटर जेट आहे. आम्ही देशासाठी या फायटर विमानांचा वापर सुरु केला आहे” असं जेलेंस्की म्हणाले. युक्रेनने अमेरिकन बनावटीची किती F-16 विमान घेतलीत ते जेलेंस्की यांनी स्पष्ट केलेलं नाही.

जेलेंस्की काय म्हणाले?

युक्रेनला अजून अशा विमानांची गरज आहे असं जेलेंस्की म्हणाले. युक्रेनमध्ये F-16 ची संख्या आणि प्रशिक्षण घेणाऱ्या वैमानिकांची संख्या पुरेशी नाहीय, असही ते म्हणाले. युक्रेनला अतिरिक्त F-16 मिळणार ही चांगली बाब आहे. नाटो देश युक्रेनला फायटर विमान आणि त्यांच्या वैमानिकांना प्रशिक्षण देण्यास उत्सुक आहेत. आमच्या सैनिकांना प्रशिक्षण मिळतय असे जेलेंस्की म्हणाले. त्यांनी डेन्मार्क, नेदरलँड, अमेरिका आणि अन्य सहयोगी देशांचे आभार मानले.

आता प्रश्न काय?

“युक्रेनला जवळपास 130 F-16 विमानांची आवश्यकता आहे. जेणेकरुन रशियाच्या हवाई शक्तीशी सामना करता येईल” असं मे महिन्यात AFP ला दिलेल्या मुलाखतीत जेलेंस्की म्हणाले होते. युक्रेनच्या सहकाऱ्यांनी त्यांना 100 पेक्षा कमी F-16 देण्याच आश्वासन दिलय. रशियाकडून सतत हवाई हल्ले सुरु असतात. त्यामुळे या महागड्या विमानांच्या सुरक्षेचा सुद्धा प्रश्न आहे.

युक्रेन कशावर अवलंबून?

जुलै महिन्याच्या सुरुवातीला रशियाने युक्रेनच्या हवाई बेसवर बॉम्ब वर्षाव केला. यात पाच फायटर विमानं नष्ट करण्याचा दावा केला होता. एअर बेसवर विमानं पुरेशा सुरक्षेशिवाय उभी होती, त्याबद्दल युक्रेनच्या पत्रकारांनी एअर फोर्सच्या अधिकाऱ्यांवर टीका केली होती. युक्रेनी सैन्य मोठ्या प्रमाणात सोवियत काळातील मिग-29 आणि सुखोई विमानांवर अवलंबून आहे.