नवी दिल्ली : यूक्रेन रशिया (Ukraine-Russia Conflict) वादादरम्यान यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की (Volodymyr Zelenskyy) यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Putin) यांना बैठक घेऊन चर्चा करुन वाद सोडवण्याचा प्रस्ताव दिला आहे. तीन दिवसांपासून सुरु असलेल्या म्यूनिच सुरक्षा संमेलनमध्ये यूक्रेनच्या राष्ट्रपती वोलोदिमीर जेलेंस्की यांनी पश्चिमी देशांच्या विरोधातील धोरण रशियानं सोडून द्यावं, असं म्हटलंय. तर, यूक्रेननं रशियाकडून होणाऱ्या आक्रमणावरुन चिंता व्यक्त केलीय. वोलोदिमीर जेलेंस्की म्हणाले की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना काय पाहिजे हे माहिती नाही. मी त्यांना चर्चेचा प्रस्ताव देत आहे. रशिया चर्चेचा पर्याय निवडू शकतं. या संकटावर शांततापूर्ण समाधान काढण्यासाठी यूक्रेन केवळ वाटाघाटीच्या मार्गानं पुढं जाऊ शकतं, असं म्हटलंय. रशिया आणि यूक्रेनच्या वादामुळ जगावर तिसऱ्या महायुद्धाची शक्यता निर्माण झालीय.
म्यूनिच सुरक्षा संमेलनामध्ये युक्रेन रशिया वादावर चर्चा घेण्यात आली होती. यूक्रेनमधील संकटाच्या पार्श्वभूमीवर पश्चिमेकडील देशांमध्ये चर्चा आयोजित करण्यात आली होती. मात्र, रशियानं या संमलेनलावर बहिष्कार टाकला आहे. रशियाचा एकही प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाला नव्हता. यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी रशियानं आमच्या देशावर बॉम्बहल्ला केल्यास प्रतिबंधांचा उपयोग नाही, असं म्हटलंय. रशिया आमच्या देशावर अणूबॉम्बचा हल्ला करु शकतो, अशी माहिती वोलोदिमीर जेलेंस्की यांनी दिली. आमच्याकडे कोणतंही शस्त्र नाही. सुरक्षा नाही आमच्याकडे फक्त सुरक्षा आणि शांतता कायम राहावी, अशी मागणी करण्याचा अधिकार असावा, असं जेलेंस्की म्हणाले.
यूक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी पश्चिमेकडील देशांनी आम्हाला मदत करायची असेल तर केवळ रशियाकडून होणाऱ्या हल्ल्याबाबतच्या तारखांवर चर्चा करण्याची गरज नाही. आम्ही आमच्या देशाच्या जमीनीचं रक्षण करु, असं जेलेंस्की म्हणाले. यूक्रेनला केवळ शांतता पाहिजे, असं ते म्हणाले.
रशिया आणि यूक्रेन यांच्यात कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यूक्रेन आणि रशिया, यूक्रेनमधील रशिया समर्थक फुटीरतावादी भागात दोन्ही बाजूकडून तणाव वाढवला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यूक्रेन आणि रशिया यांच्यातील संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमीव जर्मनी, ऑस्ट्रिया देशान आपल्या नागरिकांना यूक्रेन सोडण्यास सांगितलं आहे.
इतर बातम्या: