वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या अमेरिकेच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात त्यांनी अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत, तर अजूनही काही नेत्यांच्या ते भेटी घेणार आहेत. याच भेटीदरम्यान, एकमेकांना भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. मोदींनी ही परंपरा पाळली आहे, आणि आतापर्यंत ज्या ज्या नेत्यांनी मोदी भेटले, त्यांना काही खास भेटवस्तू त्यांनी दिल्या आहेत. या भेटवस्तू कुठल्या याचीच माहिती आपण आज पाहणार आहोत.
कमला हॅरिस यांना पूर्वजांच्या आठवणी भेट
अमेरिकेच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. या भेटीत त्यांनी भारत आणि अमेरिकेला नैसर्गिक सहकारी म्हणून संबोधलं. या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी विश्वास व्यक्त केला की, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्या नेतृत्वाखाली भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंध नवीन उंचीवर पोहोचतील. पंतप्रधान मोदींनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनाही भारत भेटीचे आमंत्रण दिले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक भेटवस्तू दिल्या. त्यातील एक महत्त्वाची आणि कमला यांच्या हृदयाच्या जवळची भेटवस्तू म्हणजे, कमला हॅरिस यांचे आजोबा पी व्ही गोपालन यांच्या आठवणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कमला हॅरिस यांना गोपालन यांच्याबद्दलच्या माहितीची एक लाकडी फ्रेम गिफ्ट केली. या लाकडी फ्रेमवर हस्तकला करुन गोपालन यांच्याबद्दलची माहिती कोरण्यात आली आहे. पी व्ही गोपालन हे भारतात वरीष्ठ सरकारी अधिकारी होते. त्यांनी विविध पदांवर कामही केलं. दरम्यान, ते भारतात पुनर्वसन मंत्रालयात सहसचिव पदावर काम करत होते. मात्र 28 जानेवारी 1966 ला त्यांची झांबिया सरकारनमध्ये प्रतिनियुक्ती करण्यात आली. तिथे त्यांनी निर्वासितांचे मदत, पुनर्वसन मंत्रालयात संचालक करण्यात आलं.
PM @narendramodi and @VP @KamalaHarris meet in Washington DC. pic.twitter.com/t8sYNA2ZGv
— PMO India (@PMOIndia) September 23, 2021
मीनाकारी पद्धतीचं बुद्धीबळही भेट
कमला हॅरिस यांचा बुद्धीबळ खेळण्याची आवड आहे. हेच पाहता पंतप्रधान मोदींनी कमला हॅरिस यांना एक मीनाकारी पद्धतीचं बुद्धीबळ गिफ्ट केलं. हे बुद्धीबळ हस्तकलेचा उत्तम नमूना आहे, ज्यातील प्रत्येक गोष्ट हाताने बारीक नक्षीकाम करुन तयार करण्यात आली आहे. हे बुद्धीबळ, त्यांतली मीनाकारी डिझाईन काशीची आठवण करुन देतं. काशी हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे, जो पंतप्रधान मोदींचा मतदारसंघही आहे.
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांना जहाज गिफ्ट
दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचीही भेट घेतली. भारत-ऑस्ट्रेलिया संबंध हे आधीपासूनच मजबूत आहेत, त्यातच दक्षिण आशियात चीनला रोखण्यासाठी भारत,ऑस्ट्रेलिया नेहमी सोबत असतात. त्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. दक्षिण आशियात चीन समुद्रमार्गावर दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. जिथं ऑस्ट्रेलिया आणि भारतीय नौदलाचं त्याला आव्हान आहे. पंतप्रधान मोदींची भेटही यासंबंधातील इशारा देणारी होती. पंतप्रधान मोदींनी स्कॉट मॉरिसन यांना एक सुंदर मीनाकारी पद्धतीचं हाताने तयार केलेलं चांदीचं जहाज गिफ्ट दिलं. हे जहाजही काशीच्या मीनाकारी नक्षीकामाची आठवण करुन देतं, पण याशिवाय, समुद्रात भारत-ऑस्ट्रेलिया मैत्रीचं प्रतीक ठरतं. त्यामुळे मॉरिसन यांना दिलेलं हे गिफ्ट खास आहे.
जापानच्या पंतप्रधानांना चंदनाची बुद्धमूर्ती भेट
जापान-भारत संबंधही खूप जवळचे आहेत, भारत त्याच बुद्धाची भूमी आहे, ज्या विचारांवर जापानचे बहुतांश लोक चालतात. त्यामुळेच भारत आणि जापान हे संबंध पहिलेपासूनच जवळचे राहिले आहेत. अगदी दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही आजाद हिंद फौजांना जापानने केलेली मदत असो, वा आता भारतातील विविध प्रकल्पांमध्ये जापानने केलेली गुंतवणूक. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी जापानचे पंतप्रधान योशीहिदे सुगा यांना चंदनाची बुद्धमूर्ती गिफ्ट केली. ही मूर्ती पू्र्णपणे बारीक नक्षीकाम करुन साकारण्यात आली आहे. चंदनाच्या सुगंधासारखे बुद्धाचे विचारही जगात चैतन्य घेऊ यावे असाच संदेश या गिफ्टद्वारे देण्यात आला आहे. याआधी जेव्हा मोदींनी जापान दौरा केला होता, तेव्हा त्यांनी जापानच्या बुद्धाच्या मंदिरांना भेटीही दिल्या होत्या.
Furthering friendship with Japan.
Prime Ministers @narendramodi and @sugawitter had a fruitful meeting in Washington DC. Both leaders held discussions on several issues including ways to give further impetus to trade and cultural ties. pic.twitter.com/l370XzB1Yt
— PMO India (@PMOIndia) September 23, 2021
हेही वाचा: