‘अमेरिकेने गैरसमजात राहू नये…’, पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे धाडस, थेट अमेरिकेला धमकवले

| Updated on: Jan 05, 2025 | 2:16 PM

पाकिस्तानला घाबरवता येणार नाही मग तो ग्रेनेल असो किंवा इतर कोणीही असो. पाकिस्तानची निर्मिती अल्लाहच्या नावावर झाली आहे. जर कोणी पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला हात घालण्याचे धाडस केले तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने गैरसमजात राहू नये..., पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचे धाडस, थेट अमेरिकेला धमकवले
पाकिस्तानची अमेरिकेला धमकी.
Follow us on

‘सुंभ जळाला तरी पीळ काही जात नाही’, असे पाकिस्तानसंदर्भात म्हणावे लागणार आहे. अनेक पातळ्यांवर संकटात असताना पाकिस्तान दहशतवाद्यांना संरक्षण देत आहे. अण्वस्त्र कार्यक्रम सुरु ठेवत आहे. पाकिस्तानच्या लांब पल्याच्या अण्वस्त्र क्षेपणास्त्रावर अमेरिकेने बंधन आणले. त्यानंतर इस्लामाबादची परिस्थिती आणखी खराब झाली आहे. त्यानंतर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांचे अमेरिकेला धमकवणारे वक्तव्य आले आहे. पाकिस्तानच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अमेरिकेला धमकवत आपला क्षेपणास्त्र कार्यक्रम सुरुच राहणार असल्याचे म्हटले आहे. अण्वस्त्र आणि लांब पल्लाचे क्षेपणास्त्र ठेवणे हा पाकिस्तानचा अधिकार आहे आणि पाकिस्तानच्या संरक्षणासाठी ते गरजेचे आहे, असे ख्वाजा आफिस यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने गैरसमजात राहू नये…

ख्वाजा आसिफ यांनी म्हटले की, अमेरिका जर बंधने आणून पाकिस्तानवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर ते गैरसमजात आहेत. हा आमचा विषय आहे. आम्ही त्याबाबत निर्णय घेणार आहोत. अमेरिकेने पाकिस्तानच्या लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाशी संबंधित तीन कंपन्यांवर

अमेरिकेकडून तीन कंपन्यांवर निर्बंध

अमेरिकाने पाकिस्तानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राशी संबंधित तीन कंपन्यांवर निर्बंध लादले आहे. जो बिडेन प्रशासनाचे उप सुरक्षा सल्लागार जोनाथन फिनर यांनी एका कार्यक्रमात पाकिस्तानचा लांब पल्ल्याचा क्षेपणास्त्र कार्यक्रम अमेरिकेसाठी धोका असल्याचे म्हटले होते. पश्चिम देशांकडून इस्त्रायल मदत दिली जात आहे. त्याबद्दल त्यांनी घेरले आहे. पश्चिम देश पाखंडी आहेत. त्यांच्या या दुप्पटीधोरणामुळे 45,000 लोकांचा मृत्यू झाला आहे.

हे सुद्धा वाचा

चोख प्रत्युत्तर देणार

पीटीआयचे संस्थापक आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सुटकेबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचे नवनियुक्त सल्लागार रिचर्ड ग्रेनेल यांनी वक्तव्य केले होते. त्यावर आसिफ यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. आसिफ म्हणाले की, पाकिस्तानला घाबरवता येणार नाही मग तो ग्रेनेल असो किंवा इतर कोणीही असो. पाकिस्तानची निर्मिती अल्लाहच्या नावावर झाली आहे. जर कोणी पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाला हात घालण्याचे धाडस केले तर त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे आसिफ यांनी म्हटले आहे.