अमेरिकेत राष्ट्रध्यक्ष निवडणूक प्रक्रियेचे काउंटडाऊन सुरु आहे. संपूर्ण जगाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यांच्या विरोधात डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार आणि भारतीय वंशाच्या महिला कमला हॅरिस निवडणूक रिंगणात आहे. येत्या पाच नोव्हेंबर रोजी अमेरिकेत मतदान होणार आहे. आतापर्यंत दोन्ही उमेदवारांनी प्रचारासाठी कोणतीही कसर ठेवली नाही. दरम्यान भारतीय वंशाच्या उमेदवार कमला हॅरिस यांना आता भारताची आठवण झाली आहे. त्यांनी त्यांच्या आईचे लहाणपणाचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोत कमला हॅरिस यांची आई डॉ. श्यामला गोपालन हॅरिस दिसत आहे. त्यांच्या सोबत कमला हॅरिस आहे.
कमला हॅरिस यांनी फोटो शेअर करत कॅप्शन लिहिले की, माझी आई वयाच्या 19 व्या वर्षी भारतातून अमेरिकेत आली. त्यांचे धाडस आणि दृढ संकल्पामुळे मी काही बनू शकली. तसेच कमला हॅरिस एका वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखातही भारतातील प्रवास आणि आईच्या आठवणी यासंदर्भात उल्लेख केला आहे. ऑनलाइन दक्षिण अशियाई प्रकाशन ‘द जैगरनॉट’मध्ये त्यांनी हा लेख लिहिला आहे. त्यात त्या म्हणतात, दरवर्षी दिवाळी साजरी करण्यासाठी आम्ही भारतात जात होतो. त्या ठिकाणी आजी-अजोबा, काका-काकू, भाऊ-बहिणीसोबत दिवाळी साजरी करत होतो. माझी आईचे दोनच लक्ष्य होते. एक म्हणचे स्तनाचा कर्करुग्णांना वाचवणे आणि मुलींचे पालन पोषण करणे हे होय.
कलमा हॅरिस म्हणतात, आजोबा निवृत्त सरकारी कर्मचारी होते. ते सकाळी उठून मित्रांसोबत फिरायला जात होते. तेव्हा मी सुद्धा त्यांच्यासोबत जात होते. या काळात मी त्यांच्याकडून वाईटावर चांगल्याचा विजय आणि लोकशाहीशी संबंधित अनेक गोष्टी ऐकत होते. तिथून त्यांना सार्वजनिक जीवनाची आणि जनतेची सेवा करण्याची इच्छा निर्माण झाली.
My mother, Dr. Shyamala Gopalan Harris, came to the United States from India alone at the age of 19. Her courage and determination made me who I am today. pic.twitter.com/nGZtvz2Php
— Vice President Kamala Harris (@VP) November 2, 2024
अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक भारतापेक्षा वेगळी आहे. त्या ठिकाणी दोनच पक्ष निवडणूक रिंगणात असतात. डेमोक्रॅटिक पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी या दोन पक्षांचे उमेदवार समोरासमोर आहे. या उमेदवारांना 50 राज्यांमधील एकूण 538 इलेक्टोरल कॉलेज वोट देतात. राष्ट्राध्यक्षपदी निवड होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला 270 किंवा त्यापेक्षा जास्त इलेक्टोरल कॉलेज वोट हवे असतात.