US Election 2024 Live Updates : ट्रम्प की कमला हॅरिस, अमेरिकेत मतदानाला सुरुवात

| Updated on: Nov 05, 2024 | 9:56 PM

US Election 2024 Live Updates : अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु झालय. डोनाल्ड ट्रम्प ही निवडणूक जिंकले, तर ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनतील. तेच कमला हॅरिस जिंकल्या, तर त्या अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनतील. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक, मतदान, मतमोजणी प्रत्येक घडामोड जाणून घ्या.

US Election 2024 Live Updates : ट्रम्प की कमला हॅरिस, अमेरिकेत मतदानाला सुरुवात
donald trump vs Kamala Harris
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 05 Nov 2024 09:56 PM (IST)

    US Election Live 2024 : कमला हॅरिस यांचं मतदारांना अपील

    अमेरिकेत आत मतदानाचा दिवस आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांनी एक महत्त्वाच अपील केलं आहे. “आज निवडणुकीचा दिवस आला आहे. आपण देशावर प्रेम करतो, म्हणून मतदान करतो. तुम्ही सर्वांनी आपला आवाज ऐका आणि मतदान करा”

  • 05 Nov 2024 09:12 PM (IST)

    भारतीय शेअर मार्केटवर परिणाम होणार?

    गेल्या काही आठवड्यांपासून भारतीय शेअर मार्केटमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. त्यातच आज अमेरिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या निकालाचे भारतीय शेअर मार्केटवर मोठे परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे.


  • 05 Nov 2024 09:10 PM (IST)

    कमला हॅरिस यांचं आवाहन काय

    मतदान सुरू होण्यापूर्वीच उमेदवार कमला हॅरिस यांनी मतदारांना आवाहन केलं आहे. निवडणुकीचा दिवस आला आहे. आज, आपल्याला मतदान करायचं आहे. कारण आपल्याला आपल्या देशावर प्रेम आहे आणि आपल्याला अमेरिकेच्या आश्वासनांवर विश्वास आहे. आपला आवाज ऐका आणि मतदान करा, असं आवाहन कमला हॅरिस यांनी केलं आहे.

  • 05 Nov 2024 09:07 PM (IST)

    अमेरिकेत विजय कुणाचाही भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार

    अमेरिकेत मतदानाला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत कमला हॅरिस विजयी होणार की डोनाल्ड ट्र्म्प याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत कुणाचाही विजय होवो, पण भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होणार असल्याचं सांगितलं जात आहे.

  • 05 Nov 2024 09:05 PM (IST)

    अमेरिकेत मतदानाला सुरुवात, कोण जिंकणार कमला हॅरिस की डोनाल्ड ट्रम्प?

    अमेरिकेत मतदानाला सुरुवात झाली आहे. काही राज्यात अमेरिकेच्या वेळेनुसार सकाळी 7 वाजता मतदान सुरू झालं आहे. तर काही राज्यात सकाळी 5 ते 10 वाजेच्या दरम्यान सुरू होणार आहे. या निवडणुकीत कमला हॅरिस जिंकतात की डोनाल्ड ट्रम्प हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे.


  • 05 Nov 2024 04:46 PM (IST)

    US Election Live 2024 : अमेरिकेत ही 7 राज्य ठरवणार पुढचा राष्ट्राध्यक्ष, सामान्य मतदारापेक्षा इलेक्टोरल वोट ज्याच्या बाजूने तो विजेता

    ट्रम्प आणि हॅरिस या दोघांपैकी एकजण काही हजार मतांच्या अंतराने राष्ट्राध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचू शकतो. असं झाल्यास हे अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा होणार नाहीय. अमेरिकेत कुठली 7 राज्य पुढचा राष्ट्राध्यक्ष ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार, जाणून घ्या…वाचा सविस्तर…..

  • 05 Nov 2024 04:43 PM (IST)

    US Election Live 2024 : EVM की बॅलेट पेपर, अमेरिकेत कसं होतं मतदान?

    भारतात विरोधी पक्ष अनेकदा निवडणुकीच्या निकालानंतर EVM मशीनवरुन गदारोळ करतात. जगातील प्रगत देश असणाऱ्या अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्ष निवडीसाठी मतदान होत आहे. तिथे मतदान EVM ने होतं की, बॅलेट पेपरवर जाणून घ्या. वाचा सविस्तर…

  • 05 Nov 2024 04:39 PM (IST)

    US Election Live 2024 : अमेरिकेत मतदानाला सुरुवात

    अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी अनेक राज्यात मतदान सुरु झालय. डियाना आणि केंटकी क्षेत्रात मतदान सुरु झालय. अमेरिकेत एकूण 50 राज्य आहेत. काही राज्यात अजून मतदान सुरु व्हायच आहे. रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक उमेदवार कमला हॅरिस यांच्यात अटी-तटीचा सामना आहे.

अमेरिकेत आज राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान सुरु झालय. अमेरिकेच्या 50 पैकी अनेक राज्यात मतदान सुरु झालय. डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पार्टीचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सामना आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी 4 वाजल्यापासून अमेरिकेत मतदान सुरु झालय. अमेरिकेत निवडणुकीच्या मतदानाआधी FBI अलर्ट आहे. निवडणुकीत असलेला धोका लक्षात घेऊन FBI ने कमांड पोस्ट बनवली आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये इलेक्शन कमांड पोस्ट बनवण्यात आली आहे.

80 जणांचा स्टाफ 24 तास निवडणूक घडामोडींवर लक्ष ठेवणार आहे. वोटिंगआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचा दावा केला आहे. “आपण एका नव्या प्रवासाची सुरुवात करणार आहोत. मला आशा आहे, आता जे काही होईल, ते चांगलं होईल. लोकांच्या मनात स्थान निर्माण करेल तोच विजय” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

निवडणुकीच्या दोन दिवस आधी सर्वे करण्यात आला. त्यात आयोवामध्ये संभाव्य मतदारांमध्ये उपराष्ट्रपती कमला हॅरिस या माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा 3 टक्के मतांनी पुढे आहेत. म्हणजे ट्रम्प यांना 44 तर हॅरिस यांच्याबाजूने 47 टक्के मत आहेत. रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वेक्षण बनावट आणि भ्रामक असल्याच सांगून फेटाळलं.