वॉशिंग्टनः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांची व्हाईट हाऊसमध्ये (white House) अर्थ तज्ज्ञांबरोबर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अर्थ तज्ज्ञांबरोबर सुरू असलेल्या बैठकीला पत्रकारांचीही उपस्थिती होती. फॉक्स न्यूजच्या (Fox News) पत्रकाराने महागाईवर जो बायडेन या छेडल्यावर त्यांना राग आला. पत्रकाराच्या प्रश्नाने विचलित होऊन त्यांनी पत्रकाराला रागाच्या भरात शिव्या दिल्या. राष्ट्रध्यक्ष बायडेन आणि पत्रकार यांच्यामध्ये झालेला सगळा वाद कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
अर्थतज्ज्ञांबरोबर झालेल्या या बैठकीला पत्रकाराने बायडेन यांना विचारले की, मध्यवर्ती निवडणुकीला देशात वाढणाऱ्या महागाईचा फटका तुमच्या पक्षाला बसू शकत का? पत्रकाराच्या या प्रश्नावर बायडेन म्हणाले की, पक्षाला याचा फटका बसण्यापेक्षा फायदाच होणार आहे. पत्रकाराच्या प्रश्नानंतर आणि त्यानंतर झालेल्या संवादानंतर बायडेन यांनी पदाला न शोभणारी शिवी दिली. त्यांनी संवाद साधताना शिव्या दिल्याने पत्रकाराने त्या बैठकीतून बाहेर येऊन त्यांनी त्यांच्याविरोधात रागाने बोलू लागला.
पत्रकाराबरोबर शाब्दीक वाद झाल्यानंतर जो बायडेन यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, मला प्रश्न विचारल्याबद्दल मला राग नाही पण पत्रकारही समजून घेत नाहीत की, बैठक कशासाठी बोलवली आहे. त्याचा बैठकीचा हेतू काय आहे. बायडेन यांनी स्पष्टीकरण दिले असले तरी, त्यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिकेच्या माध्यमक्षेत्रात हल्लकल्लोळ माजू शकतो. पत्रकार आणि राष्ट्रध्यक्ष यांच्या सवाल-जवाबानंतरही राष्ट्रध्यक्षांचा माईक चालू होता याची कल्पना बायडेन यांना नसल्यामुळे त्यांचा हा वाद आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पत्रकार परिषदेतील सवाल-जवाबानंतर व्हाईट हाऊसमध्ये गोंधळ झाल्यामुळे तिथे असलेल्या पत्रकारांना हा वाद समजू शकला नाही. त्यामुळे व्हाईट हाऊसने पुन्हा पुन्हा एकच स्पष्टीकरण दिले आहे की, देशातील महागाई कमी करणे हा सरकारचा प्रयत्न राहणार आहे, तरीही सरकारवर नेहमीच माध्यमांतून टीका केली जात असते विशेषतः फॉक्स न्यूजसारखे चॅनेलनी आमच्यावर नेहमीच टीका केली आहे.
#WATCH | US President Joe Biden appeared to be caught on a hot mic after a journalist asked him a question related to inflation at the end of his press conference
(Video Courtesy: C-Span) pic.twitter.com/ZJCP7X3QZS
— ANI (@ANI) January 25, 2022