India-America : भारताच्या नाराजीचा परिणाम, केजरीवालांवर बोलणाऱ्या अमेरिकेची आता कुठे गेली हिम्मत?

| Updated on: Apr 04, 2024 | 2:12 PM

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अमेरिकेने टिप्पणी केली. त्यानंतर भारताने कठोर भूमिका घेतली. एका पाकिस्तानी रिपोर्टरने यावरुन प्रश्न विचारल्यावर अमेरिकन अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्टपणे दिसून आली.

India-America : भारताच्या नाराजीचा परिणाम, केजरीवालांवर बोलणाऱ्या अमेरिकेची आता कुठे गेली हिम्मत?
America on Arvind Kejriwal Arrest
Follow us on

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा अमेरिका, जर्मनी आणि संयुक्त राष्ट्राच्या अधिकाऱ्यांनी विरोध केला होता. त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने कठोर भूमिका घेतली. आंतरराष्ट्रीय समुदायाने भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करु नये, असा इशारा भारताने दिला. असं झाल्यास, त्याच प्रत्युत्तर दिल जाईल असं भारताने ठणकावलं होतं. या टिप्पणीवरुन अमेरिकन अधिकाऱ्याला पाकिस्तानी वंशाच्या रिपोर्टरने प्रश्न केला. भारतातील विरोधी पक्षाच अमेरिका समर्थन करते. पण पाकिस्तानातील विरोधी पक्षाबद्दल नाही बोलत. त्यावर उत्तर देताना अमेरिकन अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर भारताने दिलेल्या इशाऱ्याची भीती दिसून आली.

एका प्रेस कॉन्फरन्स दरम्यान पाकिस्तानी वंशाच्या पत्रकाराने विचारलं की, अमेरिकेकडून भारताच्या विरोधी पक्षाबद्दल आवाज उठवला जातो. पण हेच पाकिस्तानच्या विरोधी पक्षाबद्दल होताना दिसत नाही. पाकिस्तानात अनेक राजकीय नेते तुरुंगात आहेत. यात महिला सुद्धा आहेत. त्यावर प्रवक्ता जास्त काही बोलला नाही. अमेरिकेची भूमिका सर्वच देशांसाठी समान आहे. अनेकदा आम्ही पाकिस्तानसाठी सुद्धा आवाज उठवलाय, एवढच म्हटलं.

त्याचा विरोध अमेरिकेने नाही केला

पाकिस्तानातही विरोधी पक्षाचे अनेक नेते तुरुंगात आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआयचे संस्थापक इम्रान खान बऱ्याच काळापासून तुरुंगात आहेत. पाकिस्तानच्या निवडणुकीत अनेक PTI नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलय. त्याचा विरोध अमेरिकेने केला नाही. अलीकडेच पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांबरोबर बायडेन यांची चर्चा झाली. संबंध सुधारण्याबद्दल त्यांच्यात बोलण झालं.

मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी दाखल याचिकेवर आज सुनावणी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य घोटाळा प्रकरणात अटक झाली आहे. त्यांनी आपली अटक आणि रिमांड विरोधात हाय कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर बुधवारी कोर्टाने आपला निर्णय राखून ठेवला. दिल्ली हाय कोर्ट 4 एप्रिलला याचिकेवर निर्णय देऊ शकतं. त्याशिवाय मुख्यमंत्री पदावरुन हटवण्यासाठी दाखल याचिकेवर आज सुनावणी आहे.