सिडनी: ऑस्ट्रेलियाच्या सीमा जगासाठी पुन्हा एकदा खुल्या केल्या जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने परदेशी नागरिकांसाठी ऑस्ट्रेलियाच्या सीमा बंद केल्या होत्या. पण आता ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी आंतरराष्ट्रीय प्रवास सुलभ करण्याच्या आणि निर्बंध कमी करण्याच्या हेतूने आंतरराष्ट्रीय सीमा पुन्हा उघडण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पीएम मॉरिसन यांनी सांगितलं की, ज्या राज्यात लसीकरणाचं प्रमाण 80 टक्क्यांवर पोहचलं आहे, तिथल्या आंतरराष्ट्रीय सीमा उघडल्या जातील. एबीसी वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, याची सुरुवात ही ऑस्ट्रेलियाच्या न्यू साऊथ वेल्स (NSW)राज्यापासून होणार आहे. ( australia-to-reopen-its-international-border-prime-minister-scott-morrison-announces-covishield approved in australia for use home quarantine start )
परदेशी प्रवाशांच्या होम क्वारंटाईनलाही मंजुरी
ऑस्ट्रेलियात आता पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांव्यतिरिक्त इतर परदेशी नागरिकांना 1 आठवड्याच्या होम क्वारंटाईनला परवानगी देण्यात आली आहे. याआधी ऑस्ट्रेलियात गेल्यानंतर हॉटेलमध्ये 15 दिवसांचा क्वारंटाईन काळ पूर्ण करावा लागत होता. ज्यासाठी हजारो डॉलर्स खर्च होत होते. हेच नाही तर ज्या ऑस्ट्रेलियन नागरिकांनी कोरोना लसीचे 2 डोस घेतले आहेत, त्यांना कमर्शिअल फ्लाईटमधून प्रवास करण्याची परवानगीही देण्यात आली आहे. 20 मार्च 2020 ला ऑस्ट्रेलियाने कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू केले होते. ज्यात लोकांना परवानगीशिवाय परदेश यात्रा करता येत नव्हती. तुमच्या माहितीसाठी, फक्त 2 लस घेतलेल्यांनाच 8 होम क्वारंटाईनची सुविधा मिळणार नाही, ज्यांची 1 लस झाली आहे किंवा लसच झाली नाही त्यांना 15 दिवस हॉटेल क्वारंटाईनची अट अद्यापही लागू आहे.
क्वारंटाईन फ्री प्रवासाबद्दलही विचार सुरु
दरम्यान, ऑस्ट्रेलियामध्ये क्वारंटाईन फ्री प्रवासाबद्दलही विचार सुरु आहे. ज्या देशात कोरोनाचा अजिबात प्रादुर्भाव नाही, त्या देशातील नागरिकांना क्वारंटाईन फ्री प्रवासाची मुभा देण्याचा विचार सुरु असल्याचं पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी सांगितलं, ते म्हणाले की, न्यूझीलंडसारख्या देशात कोरोनाचा अजिबात प्रादुर्भाव नाही, अशा देशातून येणाऱ्या प्रवाशांना ऑस्ट्रेलियात विना क्वारंटाईन एन्ट्री दिली जावी याबाबतही विचार सुरु आहे. सर्वांच्या संमतीनंतरहा हा निर्णय घेतला जाईल.
क्वारंटाईन फ्री प्रवासाबद्दलही विचार सुरु
पीएम स्कॉट मॉरिसन म्हणाले की, न्यूझीलंड सारख्या काही देशांसाठी सरकार विलगीकरण विनामूल्य प्रवास सुरू करण्याचा विचार करत आहे. पण असे करणे सरकारला सुरक्षित वाटले तरच होईल. मॉरिसन म्हणाले, ‘आम्ही लोकांचे जीव वाचवले, आम्ही लोकांच्या उपजीविकेचे रक्षण केले, पण आता आम्हाला एकत्र काम करावे लागेल जेणेकरून आम्ही हे सुनिश्चित करू शकू की ऑस्ट्रेलियातील लोकांना त्यांच्या देशात तेच जीवन मिळेल जे त्यांना मिळेल.’ हे लक्षात घेण्यासारखे आहे अधिकृत लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांनाच घरी अलग ठेवण्याची परवानगी दिली जाईल. लस न घेणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्येच 15 दिवस अलग ठेवणे आवश्यक आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारकडून कोविशील्डला मान्यता
ऑस्ट्रेलियात सध्या फायझर, एस्ट्राझेनिका, मॉर्डना आणि जॉन्सन अँड जॉन्सन याच लसींना मान्यता आहे. त्यामुळे भारतातून ऑस्ट्रेलियात जाणाऱ्यांची बरीच अडचण होत होती. कारण भारतात कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन, रशियाची स्पुतनिक व्ही याच लसी दिल्या जात आहे. यापैकी एकाही लसीला ऑस्ट्रेलियात मान्यता नव्हती. मात्र, आता कोविशिल्डला मान्यता देण्यात यावी असा सल्ला ऑस्ट्रेलियाच्या थेरपी गूड्स अॅडमिनिस्ट्रेशनने दिला आहे. त्यामुळे याही लसीला लवकरच ऑस्ट्रेलिया मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हेही वाचा: