आपल्याकडे ठिकठिकाणी एटीएम मशीन आहेत. त्यातून पैसे काढण्याची सुविधा आहे. रेल्वे स्थानकावर तिकीट काढण्यासाठी व्हेंडिग मशीन आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेत दूध आणि अंडी मिळवण्यासाठीही व्हेंडिग मशीन आहेत. अनेक मॉल आणि ग्रोसरी स्टोअर्समध्ये ते मशीन लावले आहेत. परंतु धक्कादायक बाब समोर आली आहे. अमेरिकेत ग्रोसरी स्टोअर्समध्ये बंदुकीच्या गोळ्यांचे व्हेडिंग मशीन लावले आहेत. त्याठिकाणी गोळ्या सहज खरेदी करता येतात. अमेरिकेत गोळीबाराचे प्रकार जगात सर्वाधिक होतात. त्यानंतरही बंदुकीच्या गोळ्या मिळवणारे व्हेंडिग मशीन ठेवल्यामुळे चर्चा होऊ लागली आहे.
अमेरिकेतील अलाबामापासून ओकलाहोमा आणि टॅक्सासमधील ग्रोसरी स्टोअरवर बंदुकाच्या गोळ्या मिळणारे मशीन लावले आहेत. दूधाच्या व्हेंडिंग मशीन शेजारी बदुकांच्या गोळ्या मिळवणारे मशीन लावले आहे. हे मशीन एटीएम प्रमाणे विकसित करता येते.
अमेरिकन राउंड्स नावाची कंपनी व्हिडिंग मशीन ग्रोसरी स्टोअरमध्ये लावत आहेत. आतापर्यंत अलाबामापासून ओकलाहोमापर्यंत आणि टेक्सासमध्ये हे मशीन लावले आहे. या व्हेंडिंग मशीनमध्ये एक आयडेंटिफिकेशन स्कॅनर आणि फेशियल रिकग्निशन सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे बंदुकीच्या गोळ्या घेणाऱ्याच्या वयाची माहिती मिळवता येते. त्यानंतरच संबंधित व्यक्तीला मशीनमधून बंदुकीच्या गोळ्या मिळवता येईल.
कंपनीचा दावा आहे की, वय व्हेरिफिकेशन टेक्नोलॉजीमुळे अधिक फायदा आहे. अन्यथा ऑनलाईन गोळ्या खरेदी करताना कोणत्या वयोगटातील व्यक्ती ते घेत आहे, त्याची माहिती मिळत नाही. परंतु व्हेंडिग मशीनमध्ये व्हेरिफिकेशन टेक्नोलॉजीमुळे वयाचे प्रमाणपत्र रिटेल स्टोरमध्ये द्यावे लागते. या व्हेंडिग मशीनमध्ये २१ वर्ष वयाचे व्यक्ती सहज गोळ्यांची खरेदी करु शकतात.
Huh. I live in a country where people can use a grocery store vending machine to buy bullets for their handguns…
…while policymakers are imposing draconian taxes and prohibitions to discourage adults from using #SaferNicotine alternatives to deadly cigarettes. pic.twitter.com/P8I6uBNY0p
— Charles A. Gardner, PhD (@ChaunceyGardner) July 10, 2024
अमेरिकेतील अनेक किराणा दुकानांमध्ये या व्हेंडिंग मशिन्स बसवण्यासही विरोध होत आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेत सामूहिक गोळीबाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. 2024 मध्ये आतापर्यंत सामूहिक गोळीबाराच्या अशा 15 घटना घडल्या आहेत. या स्थितीत किराणा दुकानात खुलेआम गोळ्या मिळत असल्याने गोळीबाराच्या घटनांमध्ये आणखी वाढ होणार असल्याचे लोकांचे म्हणणे आहे.