यातील एका व्हिडीओत इम्रान खान हे एका पुरुषासोबत आपत्तीजनक स्थितीत असल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. हे व्हिडीओ बाहेर आल्याने इम्रान खान यांचे टेन्शन वाढले आहे. त्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी हे व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत, असा दावा इम्रान खान यांनी बचावासाठी केला आहे. यापूर्वी इम्रान खान यांची घटस्फोटीत पत्नी रेहमं खान यांनीही इम्रान खान हे समलैंगिक असल्याचा आरोप केला होता.
Ad
इमरान खान
Image Credit source: TV 9 marathi
Follow us on
इस्लामाबाद – आपल्या प्लेबॉय या इमेजमुळे कुप्रसिद्ध असलेले पाकिस्तानचे (Pakistan)माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. समलैंगिक संबंधांच्या प्रकरणात इम्रान पुन्हा चर्चेत आले आहेत. इम्रान खान यांचे अनेक व्हिडीओ (Videos)सध्या पाकिस्तानच्या शोल मीडियात व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओत इम्रान खान हे एका पुरुषासोबत आपत्तीजनक स्थितीत असल्याचा दावा पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. हे व्हिडीओ बाहेर आल्याने इम्रान खान यांचे टेन्शन वाढले आहे. त्यांचे चारित्र्यहनन करण्यासाठी हे व्हिडीओ तयार करण्यात आले आहेत, असा दावा इम्रान खान यांनी बचावासाठी केला आहे. यापूर्वी इम्रान खान यांची घटस्फोटीत पत्नी रेहमं खान यांनीही इम्रान खान हे समलैंगिक असल्याचा आरोप केला होता. एका पाकिस्तानी पत्रकाराने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान या लीक झालेल्या व्हिडीओत एका पुरुषासोबत असल्याचे दिसते आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी या व्हिडीओंच्या वैधतेची तपासणी पाश्चात्य एजन्सींच्या माध्यमातून केली आहे, आणि त्यात हे व्हिडीओ वैध असल्याचे समोर आले आहे. याच दरम्यानच्या काळात इम्रान खान यांना आपले व्हिडीओ लीक होत असल्याचे समजले. त्यानंतर इम्रान खान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत असा आरोप केला आहे की, विरोधक त्यांचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
Whether Imran Khan is gay or bisexual should be irrelevant for both his followers & critics since we should comment on his politics, not his sexuality.
इम्रान खान समलैंगिक, पार्टीतील अनेक नेत्यांशी संबंध– रेहम खान
नवाज शरीफ यांची पार्टी पीएमल (एन) आणि जरदारी यांची पार्टी पीपीपी या दोन्ही पक्षांनी मिळून बोगस व्हिडीओ तयार करणाऱ्या कंपन्यांशी करार केल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे. यात इम्रान यांच्या प्रतिमाभंजनाचा एकसूत्री कार्यक्रम असल्याचेही खान यांचे म्हणणे आहे. इम्रान हे कितीही व्हिडीओ खोटे असल्याचा दावा करीत असेल तरी त्यांची आधीची पत्नी रेहम खान यांनीही इम्रान हे समकैलिंग असल्याचे सांगितले आहे. रेहम खान यांनी लग्नापूर्वी इम्रान यांनी आपले लैगिंक शोषण केल्याचा आरोपही केला आहे.
रेहम खान यांनी आपल्या पुस्तकात असा दावा केला आहे की, इम्रान खान हे समलैंगिक आहेत आणि त्यांचे पाकिस्तान तहरीक ए इन्साफ या पार्टीतील अनेक सदस्यांशी संबंध आहेत. इम्रान यांचे पाकिस्तानी अभिनेता हमजा अली अब्बासी आणि पार्टीतील सदस्य मुराद सदई यांच्याशी समलैंगिक संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. मुराद सदई यांनी रेहम खान यांचे आरोप यापूर्वी फेटाळले आहेत.