भारताच्या शेजारी देशात आरक्षणाविरोधात जनता रस्त्यावर, बस जाळल्या, हिंसक प्रदर्शनात 6 मृत्यू

| Updated on: Jul 17, 2024 | 9:02 AM

सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या विरोधात जबरदस्त विरोध प्रदर्शन सुरु आहे. आरक्षण संपवण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाने हिंसक रुप घेतलं आहे. पोलिसांसोबत झडप झाली. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 100 पेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले आहेत.

भारताच्या शेजारी देशात आरक्षणाविरोधात जनता रस्त्यावर, बस जाळल्या, हिंसक प्रदर्शनात 6 मृत्यू
violence in bangladesh
Image Credit source: agency
Follow us on

बांग्लादेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याच्या विरोधात जबरदस्त विरोध प्रदर्शन सुरु आहे. हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरुन आरक्षण बंद करण्याची मागणी करत आहेत. आरक्षणाविरोधातील या आंदोलनाने हिंसक रुप घेतलं आहे. पोलिसांसोबत झडप झाली. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 100 पेक्षा जास्त आंदोलक जखमी झाले आहेत. परिस्थिती इतकी चिघळलीय की, ढाकासह बांग्लादेशच्या वेगवेगळ्या शहरात शाळा, कॉलेजेस आणि मदरसे बंद करावे लागले आहेत.

ढाका, चटगांव आणि उत्तर पश्चिम रंगपुर येथे पोलिसांसोबत झालेल्या झटापटीत 6 आंदोलकांचा मृत्यू झाला. यात 3 विद्यार्थी आहेत. आरक्षणाविरोधात सर्वाधिक आंदोलन युनिवर्सिटी परिसरात सुरु आहे. ही परिस्थिती पाहता, विश्वविद्यालयांच्या आसपास मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून चार प्रमुख शहरात BGB च्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे.

रस्त्यांवर सन्नाटा पसरला

बांग्लादेशच्या विविध शहरात हिंसाचार सुरु आहे. त्यामुळे वर्दळीच्या रस्त्यांवर सन्नाटा पसरला आहे. एकदिवस आधीच अज्ञात आंदोलकांनी मोलोटोव कॉकटेल विस्फोटकांनी बस पेटवून दिली. काही शहरात हिंसाचराच्या छोट्या मोठ्या घटना समोर आल्यात. बांग्लादेशच्या शिक्षण मंत्रालयाने स्टेटमेंटमध्ये म्हटलय की, “विद्यार्थ्यांची सुरक्षा ध्यानात घेऊन शाळा, कॉलेज, मदरसे आणि पॉलिटेक्निक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत”

कशी आहे आरक्षणाची व्यवस्था?

स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांना सरकारी नोकरीमध्ये 30 टक्के आरक्षण मिळतं.

बांग्लादेशात महिलांसाठी सुद्धा 10 टक्के आरक्षणाची व्यवस्था आहे.

त्याशिवाय वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी 10 टक्के आरक्षण आहे.

एथनिक मायनॉरिटी जसं की, संथाल, पांखो, त्रिपुरी, चकमा आणि खासीसाठी 6% कोटा आहे. हिंदुंसाठी वेगळ आरक्षण नाहीय.

हे सगळं मिळून आरक्षण 56% होतं. त्याशिवाय उरलेले 44 टक्के मेरिटसाठी आहे.